Saturday, March 25, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

आदित्य ठाकरेंना धक्का, सहसचिव शर्मिला येवलेंसह 35 पदाधिकारी बाहेर पडणार

by Team Global News Marathi
November 19, 2022
in महाराष्ट्र
0
आदित्य ठाकरेंना धक्का, सहसचिव शर्मिला येवलेंसह 35 पदाधिकारी बाहेर पडणार

 

शिवसेनेमध्ये दोन गट पडले असल्याने नेत्यांसबोत अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येही फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा दोन्ही गटाकडून केला जात असला, तरी अद्याप त्याबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही. यादरम्यान दोन्ही गटांमध्ये पक्षप्रवेश सुरु असून आपली बाजू भक्कम असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातच आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला युवा सेना पदाधिकारी धक्का देण्याच्या तयारीत आहेत. युवा सेना सहसचिव शर्मिला येवले पदाधिकाऱ्यासह बाहेर पडणार युवा सेना सहसचिव शर्मिला येवले यांच्यासह 35 पदाधिकारी युवा सेनेतून बाहेर पडणार आहे. शर्मिला येवले आणि इतर 35 पदाधिकारी उद्या आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.

पक्षात संधी दिली जात नसल्याचा आरोप करत राजीनामा देणार आहे. उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याची घोषणा करणार आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का पचवावा लागणार आहे. दरम्यान, काही दिवसांपासून अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी देखील त्या शिंदे गटात सहभागी होणार असल्याचं सूचक विधान केलं होतं.

दीपाली सय्यद बाहेर पडणार? राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि त्याआधीही दीपाली सय्यद प्रचंड सक्रीय झाल्याचं चित्र दिसत होतं. अनकेदा त्यांनी विरोधकांवर जाहीरपणे टीका केली असून, सडेतोड उत्तरही दिलं. ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्यासाठीही त्या प्रयत्न करत होत्या. पण पक्षात सुषमा अंधारे यांचा प्रवेश झाल्यापासून दीपाली सय्यद फारशा सक्रीय झालेल्या दिसत नाहीत. याचं नेमकं कारण विचारण्यात आलं असता त्यांनी ‘मी स्क्रीनवर येऊन तू-तू मै-मै करत नाही. जेव्हा गरज होती तेव्हा मी केली,” असं सांगितलं.

तसेच तुम्ही सध्या शांत का आहात? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की “सुषमाताई नुकत्याच आल्या असून त्यांना आपण शिवसेनेत आल्याचं आणि आपलं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. शिवसेनेत काम करताना मला आता साडेतीन वर्षं झाली आहेत. स्क्रीनवर येऊन टिप्पणी केली, कुरघोड्या केल्या तरच तुम्ही राजकारणात सक्रीय आहात असा समज करण्याची गरज नाही. मी कामंही केली पाहिजेत.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
निदान हे स्वत: सावरकरांचे वंशज म्हणून घेणाऱ्यांनी हे थांबवलं पाहिजे. ही आपली परंपरा नाही’

निदान हे स्वत: सावरकरांचे वंशज म्हणून घेणाऱ्यांनी हे थांबवलं पाहिजे. ही आपली परंपरा नाही'

Recent Posts

  • राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे
  • ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा बार्शीत गुन्हा दाखल

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group