एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या चिन्हावरून वाद सुरू झाला होता त्याअक्ट वॆद्रियाया निवडणूक आयोगाने थेट शिंदे गटाच्या बाजूने निकाल देऊन उद्धव ठाकरे गटाला धक्का दिला होता. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. यातच आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. “भाजपसोबत जाऊ या ,नाहीतर मला अटक होईल. असे म्हणत ते मातोश्रीवर येऊन रडले होते”, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
यावरूनआता आमदार रवी राणा याच मुद्यावरून टीका केली आहे. रवी राणा म्हणाले,’आदित्य ठाकरे हे बालिशपणे वक्तव्य करत आहेत. एखादा माणूस हताश, निराश होतो तेव्हा असं बोलतो. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दोघंही निराश झालं असून त्यांना हेदेखील समजलं आहे की शरद पवारही त्यांची साथ सोडतील. त्यामुळेच आता एकनाथ शिंदेंवर आरोप केला.” असं म्हणत रवी राणा यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.
दरम्यान,आदित्य ठाकरे यांनी हैदराबाद येथील गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हा दावा केला आहे. आदित्य ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, “शिवसेना सोडून गेलेले 40 आमदार हे स्वत: साठी आणि पैशांसाठी गेले आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून अटक होणार होती, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री आमच्या घरी येऊन रडले होते. जर भाजपसोबत गेलो नाही तर ते मला अटक करतील, असे ते म्हणाले होते.”