मुंबई | अदानी कंपनीने मुंबई विमानतळावर स्वत:च्या नावाचा बोर्ड लावल्याने शिवसैनिकांनी हा बोर्ड काठीने तोडून उखडून फेकला. त्यानंतर अडाणी कंपंनी या प्रकरणानंतर शहाणपणा घेत केलेल्या कामाबद्दल ट्विट करून दिलगिरी व्यक्त केली होती.
या घडलेल्या प्रकारावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या कृतीचं समर्थन केलं आहे. शिवसैनिकांनी योग्यच केलं. त्यात चुकीचं काय केलं? असा सवाल करतानाच शिवसेना सत्तेत असली तरी असले प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना हा इशारा दिला. कुणी मालकी हक्क दाखवून ब्रँडिंग करत असेल. प्रचार प्रसार करत असेल तर शिवसेना सत्तेत असला तरी असले प्रकार सहन करणार नाही. काल पाहिलं ना तुम्ही हे असंच होत राहणार, असं राऊत म्हणाले.