अभिनेता मिथून चक्रवर्ती यांचा अखेर भाजपामध्ये केला जाहीर प्रवेश

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून थेतील वातावरण चांगलेच तापू लागले होते. त्यात अनेक नेत्यांच्या भव्य रॅली, प्रचार सभा सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज कोलकत्त्यातील ब्रिगेड मैदानावर भव्य सभा होत आहे.

याच दरम्यान ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती आज भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आज मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपामध्ये जाहीरित्या प्रवेश केला आहे. भाजपच्या रॅली दरम्यान मुकुल राय यांच्या उपस्थितीत भाजपात मिथुन चक्रवर्ती यांनी प्रवेश केला. त्यामुळे मिथून यांनी पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या राजकारणात पाऊल ठेवलं आहे.

कोलकात्याच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडवर पंतप्रधान मोदींची पहिली सभा ऐतिहासिक सभा असल्याचा दावा केला जात आहे. यासाठी भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या उपस्थिती आधीच मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणआधी मिथुन चक्रवर्ती यांचे भाषण होणार असल्याचीही चर्चा आहे. या भव्य सभेत कडक सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. या सभेत १५०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून सुरक्षेसाठी ३००० जवान तैनात केले आहेत.

Team Global News Marathi: