5 कोटींसाठी विश्वासू साथीदारानेच केला चंद्रशेखर गुरुजींचा खून

 

सरल वास्तुतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची 5 कोटींसाठी हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अनेक दिवसांपासून बेनामी मालमत्ता विकून पाच कोटी देण्यासाठी दबाव आणणाऱ्या महांतेश शिरूर याने गुरुजींचा खून केल्याचे समोर आले आहे. चंद्रशेखर यांच्यासाठी सर्वस्व अर्पण केल्यावर मालमत्तेचे पैसे का द्यायचे, अशी विचारणा मारेकऱ्याने केली आणि रागाच्या भरात मंजुनाथ मरेवाड याच्या सहकार्याने त्यांचा खून केला.

चंद्रशेखर यांचा बहुतांश व्यवसाय मारेकरी महांतेश शिरूर पाहत होता. चंद्रशेखर यांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता त्याच्या नावावर केली होती. मुंबईतील सरला वास्तूचे प्रमुख म्हणून काम करून शिरूर याने चंद्रशेखर यांचा विश्वास संपादन केला होता. मात्र या दरम्यान एक मालमत्ता पाच कोटींना विकल्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. यामुळे गुरुजींनी महांतेशला नोकरीवरून काढून टाकले. त्यामुळे याच रागातून महांतेशने गुरुजींची हत्या केली.

पोलिसांनी मारेकऱ्यांची कवायत घेतली असून, पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी करण्यात आली. यानंतर मारेकऱ्यांनी गुरुजींचा खून केल्याची कबुली दिली. बेनामी संपत्तीच्या पार्श्वभूमीवर हा खून केल्याचे मारेकऱ्यांनी म्हटले. यानंतर पोलिसांनी चंद्रशेखर यांच्याकडे किती मिळकत आहे, मालमत्ता कोठे आहे, कोणाच्या नावावर आहे, या सर्व गोष्टींची सविस्तर चौकशी सुरू केली. दरम्यान, विश्‍वासातील दहाहून अधिक लोकांच्या नावे गुरुजींनी बेनामी मालमत्ता खरेदी केल्याचे आरोपींनी उघड केले. हुबळी-धारवाडच्या आसपास चंद्रशेखर यांची 200 एकर जमीन बेनामी असल्याचे तपासात समोर आले आहे.

Team Global News Marathi: