22 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी नासाचे मार्स ग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान पोहोचले होते मंगळावर ..! जाणून घ्या सविस्तर-

आजची माहिती

११ सप्टेंबर १९९७

22 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी नासाचे मार्स ग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान पोहोचले होते मंगळावर ..!

ग्लोबल न्यूज नेटवर्क: १९८८ ते १९९९ कालावधीतील लॉंच विंडोत एकूण १० मोहिमा पाठवण्यात आल्या. यातील ७ अयशस्वी ठरल्या तर एका मोहिमेला आंशिक यश मिळालं. तर ७ नोव्हेंबर १९९६ रोजी पाठवण्यात आलेले मार्स ग्लोबल सर्वेयर आणि त्या नंतर एक माहिन्या पेक्षा कमी कालावधी नंतर पाठवण्यात आलेल मार्स पाथफाईंडर या मोहिमा मात्र यशस्वी ठरल्या. मार्स पाथफाईंडर मंगळावर उतरल होत आणि त्याने ८४ दिवस काम केल तर मार्स ग्लोबल सर्व्हेअर पूर्ण सात वर्ष आपली साथ दिली.

मार्स ग्लोबल सर्व्हेअर ने आपली प्राथमिक मोहिम जानेवारी २००१ मध्ये पूर्ण केली. पण यानाची एकूण प्रकृती बघता मोहिमेचा कालावधी दोनदा वाढवण्यात आला. तिसऱ्या कालावधीत २ नोव्हेंबर २००६ रोजी यानाचा पृथ्वीशी संपर्क बंद झाला होता. मग तीन दिवसांनी अगदी मंद असा सिग्नल मिळाला होता. पण तो यानाशी संपर्क पून्हा स्थापित करण्यासाठी पुरेसा नव्हता. शेवटी जानेवारी २००७ मध्ये ही मोहिम बंद करण्याची घोषणा करण्यात आली.

सर्व्हेअर यान एकूण ७५ कोटी किलोमीटरचा प्रवास ३०० दिवसात पूर्ण करून ११ सप्टेंबर १९९७ रोज मंगळाजवळ पोचले. या महीमेच्या उद्दीष्ठा पैकी मंगळाच्या वातावरणाचा सखोल अभ्यास, मगंळावर सजीव कधी होते किंवा नाही आणि असले तर त्याची उत्क्रांती झाली होती का, मंगळाच्या भौगोलिक बदलांचा अभ्यास आणि मंगळावर पाण्याचा इतिहास शोधणे हे प्रमुख होते.

या संशोधनासाठी जी वेगवेगळी उपकरणे पाठवण्यात आली होती त्यातील मार्स ऑरबयटर कॅमेरा (एम ओ सी) हे मुख्य उपकरण म्हणता येईल. या कॅमेऱ्याचे पण तीन भाग होते. एक कॅमेरा श्वेत शामल चित्र घेण्यासाठी होता. हा हायरिझोलुश चा कॅमेरा होता. या कॅमेऱ्यातून मंगळाच्या ३ कि.मी. पर्यंतच्या भागाचे चित्र घेण्यात येउ शकत होते. तर दुसरा कॅमेरा लाल आणि निळा रंगात चित्र घेणारा होता. तिसरा कॅमेरा मंगळाच्या मोठ्या भागाचे चित्र घेत होता.

या कॅमेऱ्याने आपल्या कारकिर्दित दोन लाख चाळीस हजार चित्र पाठवली. या कालावधी मंगळाने सूर्याच्या ४.८ परिक्रमा पूर्ण केल्या होत्या. म्हणजे या चित्रांवरून सुमारे पाच वर्षाच्या कालावधीत मंगळाच्या वातावरणा कसे बदल घडतात याची माहीत आपल्याला मिळाली होती.

दुसर उपकरण होते मार्स ऑरबायटर लेझर अल्टीमीटर – या उपकरणाचा वापर यान मंगळाच्या पृष्ठ भागापासून किती दूर आहे याची नोंद ठेवण्या करता करण्यात आला होता. त्या साठी हे उपकरण मंगळाच्या दिशेने दर सेकंदाला १० अधोरक्त किरणांची स्पंदने पाठवत आणि परावर्तित झालेल्या स्पनंदाना परत याना पर्यंत येण्यास किती वेळ लागला हे मोजत.

मंगळाच्या पृष्ठ भागा पासून यानाच्या अंतराचे अचुक अनंतर मिळाल्याने मंगळाच्या पृष्ठ भागवरील डोंगरदऱ्यांच्या उची आणि खोलीचे मोज माप मिळ्यास ही माहीती महत्वाची होती.
थर्मल एमिशन स्पेक्ट्रोमीटर या उपकरणाच्या मदतीने आपल्याला मगंळावरच्या वायू, द्व आणि घन अवस्थेतील रेणूंची माहीती मिळण्यास मदत झाली. याचा मुख्य शोध म्हणजे मंगळावर मोठ्या प्रमाणात ऑलेव्हीन खनीज सापडल्याचा.

ऑलिव्हीन हे मॅग्नेशियम, लोह आणि सिलीकेटचे संयुग आहे. ऑलिव्ह सारख्या हिरव्या रंगामुळे याचे नाव ऑलिव्हन पडले आहे. खगोलशास्त्रात हे एक महत्वाचे खनिज आहे. हे खनीज उल्का पाषाणात, चंद्राच्या मातीत, तर धूमकेतूंमध्ये पण सापडत. तसेच याची उपस्थिती बीट पिक्टोरिस या ताऱ्याच्या भोवताच्या धूलीकणात सापडली आहे.

मॅग्नेटोमीटर – इलेक्ट्रॉन रिफ्लेक्टोमीट हे उपकरण मंगळाच्या चुबंकीय क्षेत्राचा अभ्यास आणि सौरवायुचा यावर काय परिणाम होतो त्याचा अभ्यास करण्यासाठी होता. हे अत्यंत संवेदनशील उपरकण होते.

या मोहीमेच्या अंती जे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले त्यातील काही प्रमुख असे होते-
मंगळाच्या पृष्ठभागवर अनेक पापुद्र्यांचे थर आहेत आणि यांची जाडी सुमारे १० कि.मी. इतकी आहे. हे असेल तर हवामानाच्या बदलांमुळे शक्य झाले आहेत.
मंगळाच्या दोन्ही गोलार्धांवर समान प्रमाणात विवर आहेत जी वाळू खाली गाडल्या गेली आहेत. तर काही विवर वर पण आली आहेत.

मंगळावर अनेकदा वादळ येतात. मंगळावर अनेक ठिकाणी वाहून गेल्ल्या पाण्याची स्पष्ट चिन्हे दिसली आहेत. मंगळाच्या पृष्ठभागावर हेमेटाइट हे खनीज सापडल आहे – हेमेटाइट हे लोह आणि प्राणवायूचे संयुग आहे (याला आपण गंज म्हणूनही ओळखतो) – हे त्याच्या पृष्ठ भागावर वाहत्या पाण्याने आणल असणार आहे.

थर्मल एमिशन स्पेक्ट्रोमीटर ने मंगळाच्या जवळ जवळ सर्व पृष्ठ भागावर ज्वालामुखीतून आलेल्या दगडमातीची उपस्थिती असल्याचे दाखवले. काही खूप मोठ्या आकाराचे दगड दिसून आले ज्याचा अर्थ असा निघतो की मंगळावर नुसती ठिसूळ माती नाही तर अनेक घट्ट अवस्थेत दगड पण आहे.
एकूण ही मोहीम फार यशस्वी ठरली आणि पुढच्या मोहीमांसाठी या अनुभवाचा मोठा उपयोग झाला.

संकलन
अनिल देशपांडे

साभार
नेट

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: