१० कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात २०हजार ९०० कोटी !

१० कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात २०हजार ९०० कोटी !

नवी दिल्ली : तळागाळातील शेतकर्‍यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम-किसान) योजने’अंतर्गत दिल्या जाणार्‍या आर्थिक मदतीचा दहावा हप्ता ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून जारी केला. यामुळे सुमारे दहा कोटींपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांच्या खात्यात २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे.

यावेळी पंतप्रधानांनी ३५१ ‘एफपीओ’ अर्थात कृषी उत्पादक संघटनांना १४ कोटी रुपयांहून अधिक रक्कमही हस्तांतरित केली. यामुळे १.२४ लाखांहून जास्त शेतकर्‍यांना लाभ होणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी काही कृषी उत्पादक संघटनांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, कृषिमंत्री आणि विविध राज्यांमधील शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

“ ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’ ही देशातल्या शेतकर्‍यांसाठी मोठा आधार आहे. आज त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम मोजली, तर आतापर्यंत १.८० लाख कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले आहेत. शेतकरी उत्पादक संघटना ‘एफपीओं’च्या माध्यमातून छोट्या शेतकर्‍यांना सामूहिक शक्तीची अनुभूती येत आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: