Friday, February 3, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

“२०२४च्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही”

by Team Global News Marathi
December 8, 2022
in महाराष्ट्र
0
“महाराष्ट्रात महिलांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई केलीच पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असो” – नाना पटोले

 

कोरोनाचा धोका कमी होताच, हळूहळू ठिकठिकाणी निवडणुकांचे पडघम वाजू लागले. दिल्लीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल काल लागले.त्यात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला. दुसरीकडे गुजरात विधानसभेत सलग सातव्यांदा भाजपाने बाजी मारली. हिमाचल प्रदेशात काँग्रेस-भाजपामध्ये काँटे की टक्कर दिसत आहे. पण काँग्रेसमध्ये गुजरात २०१७ ला जी ऊर्जा दिसली होती ती गुजरात २०२२ निवडणुकीत दिसत नसल्याची चर्चा आहे. या मुद्द्यावर काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सविस्तर उत्तर दिले.

“सध्या देशाच्या संवैधानिक व्यवस्थेलाच धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या महामारीत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले. लसीकरणाची भूमिका मांडताना त्यावर मोदींचा फोटो होता. पण आता काही लोक याच लसींच्या साइडइफेक्टसाठी कोर्टात गेलेत. अनेक इतर गोष्टीही चुकीच्या घडत आहेत. या सर्व चुकीच्या गोष्टींविरोधात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे. निवडणुका येत असतात, जात असतात. संविधान वाचवणं महत्त्वाचे आहे. कोरोना असतानाही भाजपा निवडणुकांच्या मागे लागले होते. ५ वर्षांनी पुढे पुन्हा निवडणुका येतील. निवडणुका आमच्यासाठी महत्त्वाच्या नाहीत”

“हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला काँग्रेसने धक्का दिला आहे. तिथे भाजपाची सत्ता असतानाही आता परिवर्तन घडत आहे. आप पक्ष कोणाची बी टीम आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मला त्यावर काही बोलायची गरज नाही. त्यामुळे काँग्रेसला कोणाचीही डोकेदुखी झालेली नाही. लोकसभेच्या निवडणुकीत गुजरातमधूनच तुम्हाला देशाच्या सत्तेचे परिवर्तन पाहायला मिळेल. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही बघाल, भाजपाला हेच गुजरात त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही,” असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
खडसेंचे कारनामे लवकरच समोर येतील: गिरीश महाजनांचा इशारा

मी कुणाचे पाय चाटून मोठा झालो नाही; एकनाथ खडसेंचे गिरीश महाजनांना टोला

Recent Posts

  • मालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण
  • ईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
  • शुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
  • व्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं ? एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा
  • कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group