20 कोटींच्या पॅकेज वरून मनसेने उपस्थित केला हा सवाल वाचा….

20 कोटींच्या पॅकेज वरून मनसेने उपस्थित केला हा सवाल वाचा….

सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा मंगळवारी रात्री आठ वाजता देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला. तसेच पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पॅकेजवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोदी सरकार समक्ष सवाल उपस्थित केला आहे .

मोदी याच्यावर टीका करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करून प्रश्न उपस्थित केला आहे. “२० लाख कोटी रुपयांचं पॅकेज देणारे PMCare फंडासाठी एव्हढी जाहिरात का करत आहेत?,” असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान कोरोनाव्हायरसचे संकट संपलेले नाही, असे सांगताना पंतप्रधानांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळायला हवेत, हे सांगितले . आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी मास्क लावूनच काम करा. 18 तारखेनंतर चौथा लॉकडाऊन सुरू होईल. पण त्याचे नियम वेगळे असतील. त्याची माहिती 17 तारखेपर्यंत सविस्तरपणे सांगितली जाईल, असे ते म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: