राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदावर असताना भ्रष्ट पद्धतीने जावयाच्या कंपनीला 1500 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. आता या प्रकरणाची लोकायुक्तांद्वारे चौकशी सुरु झाली आहे. तसेच लोकायुक्तांसमोर येत्या 2 ऑगस्ट रोजी यासंदर्भातील सुनावणी होईल. त्यामुळे मंत्रिपदाच्या कारकीर्दीत केलेला भ्रष्टाचाराचा हिशोब हसन मुश्रीफ यांना द्यावाच लागणार, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलंय. यासंदर्भातील एक ट्विट सोमय्या यांनी केलंय. तसेच त्यासोबत लोकायुक्तांचे पत्रही त्यांनी ट्विट केलेय.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माजी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर मागील वर्षी भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यांच्या मते मुश्रीफ यांच्या कुटुंबियांनी तब्बल 100 कोटी रुपयांचा घोटाळा केलाय. मुश्रीफ यांच्या कुटुंबियांकडे 47 कंपन्यांकडून पैसे आले असून कोणत्या कंत्राटदारांकडून हा पैसा आला, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकार असताना केली होती.
तसेच मुश्रीफांची बेनामी सपत्ती जप्त करा, अशी मागणीदेखील त्यांनी केली होती. शेल कंपन्यांतून मुश्रीफ यांच्याकडे हा पैसा आला असून ठाकरे सरकारने या प्रकरणी चौकशी का केली नाही, असा सवाल तेव्हा किरीट सोमय्यांनी केला होता. भारत सरकारने मुश्रीफांविरोधात पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. किरीट सोमय्या यांनी आता हसन मुश्रीफ यांच्याविरोधात लोकायुक्तांमार्फत चौकशी होणार असल्याची माहिती आज ट्विटरद्वारे दिली. यासंदर्भातील एक पत्रही त्यांनी ट्विट केलं.
#HasanMushriff ₹1500 crore Grampanchayat Tender to DAMAD Son in Law Co Scam
Hearing at Lokayukta on 24 August
हसन मुश्रीफ 1500 कोटी ग्रामपंचायत मंत्रालयचा-जावई चा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट
24 ऑगस्ट रोजी लोकायुक्त येथे सुनावणी@Dev_Fadnavis @mieknathshinde @cbawankule @girishdmahajan pic.twitter.com/5WSc1z0Nfo— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 19, 2022