हा माजी कर्णधार होणार बीसीसीआय चा अध्यक्ष, राजीव शुक्ला यांनी केली घोषणा

नवी दिल्ली । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सलामीवीर सौरव गांगुली यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याची घोषणा केली. 13 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत सौरव गांगुली यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. राजीव शुक्ला यांनी 14 ऑक्टोबर रोजी दुपारी जाहीर केले.

राजीव शुक्ला यांनी माहिती दिली

या संदर्भात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सदस्य राजीव शुक्ला म्हणाले आहेत की, “आम्ही सौरव गांगुलीला बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून निवडले आहे. याची अधिकृत घोषणा 23 ऑक्टोबरला होईल.” बीसीसीआयच्या निवडणुकांचे निकाल येत्या 23 ऑक्टोबरला लागणार आहेत.

दुसरीकडे, सौरव गांगुली यांनी मुंबईत बीसीसीआय अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर म्हटले आहे की, “मी अशा स्थितीत आहे जेथे संघाच्या हिताच्या दृष्टीने मी निर्णय घेऊ शकतो ज्यामुळे संघाचा फायदा होईल. मला आशा आहे. की आम्ही येत्या काही महिन्यांत भारतीय क्रिकेट बोर्डाला सामान्य स्थितीत आणू.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: