हार्दिक पटेल आक्रमक : मराठीत ट्विट करून महाराष्ट्र सरकारला खडसावले !

मुंबई : शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन गड किल्ल्यांचा विकास करण्याच्या नावाखाली लग्न समारभांसाठी भाड्याने देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने घेतला आहे. त्यावर राज्यातील सर्वच स्तरांतून टिका झाली आहे. विरोधीपक्षांनी या निर्णयावरून सरकारला धारेवर धरले आहे. आता गुजरात काँग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल यानीही या विषयावर भाष्य केले आहे.

त्यांनी मराठीत केलेल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे की, ख़बरदार महाराष्ट्र भाजपा सरकार गड़किल्ले भाड्याने दयायला ते काय तुमच्या बापाची जहागिर नाही. एवढीच भीक लागली असेल तर मंत्र्यांचे बंगले, मंत्रालय, राजभवन भाड्याने दया… जय शिवराय असा आक्रमक इशारा दिला आहे.

गुजरात च्या निवडणुकीतील बॅनर वर पण त्यांनी फ्रंट ला महाराज यांचा फोटो लावला होता.पटेल हे सुरुवातीपासून शिवप्रेमी म्हणून ओळखले जातात.

राज्यातील गडकिल्ल्यांकडे वाढता पर्यटनाचा ओघ पाहता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील ३५३ गड किल्ल्यांपैकी  १०० संरक्षित किल्ल्यांची निवड करून त्यातील २५ किल्ले खासगी उद्योगांना हेरिटेज टुरिझमच्या नावाखाली विकासास देण्याची योजना आखली आहे. या उद्योगांना ६० ते ९० वर्षांच्या करारावर हे किल्ले देणार असून गड किल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल्स, लग्नसमारंभ व अन्य करमणुकीच्या कार्यक्रमासाठी या किल्ल्याचा वापर करण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला राज्यमंत्रिमंडळाने ३ सप्टेंबरला मंजुरीही दिली होती.

या प्रस्तावाची बातमी इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर समाजातील सर्वच थरातून संतापाची लाट उसळली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ‘गडकिल्ल्यांना हात लावाल, तर याद राखा’ असे ट्विट करून सरकारला बजावले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयाला विरोध करताना हा तुघलकी निर्णय असून हा मराठी मातीचा अस्मितेचा अपमान आहे, गडकिल्ले हे कुणाच्या बापाची जहागिर नाही, बेशरमसरकार असे ट्विट केले. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही या निर्णयाचा निषेध करत जे औरंगजेबाला जमलं नाही ते महाराष्ट्र सरकारनं करून दाखवलं, केवळ संतापजनक, विकास हवा पण गडकोटांचं पावित्र्य राखूनच अशा शब्दात टीका केली होती.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: