सचिन तेंडुलकर – “जर विराटने माझा 100 शतकांचा विक्रम मोडला तर मी …”

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यात 42 वे एकदिवसीय शतक झळकावले. विश्वचषकदरम्यान कोहलीने फलंदाजीतून एकही शतक ठोकले नाही परंतु त्रिनिडाड वनडे सामन्यात त्याने 11 डावांनंतर शतक झळकावले. या शतकानंतर विराट कोहलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकूण 67 शतकांचा पल्ला पार केला आहे आणि आता तो भारताचा माजी खेळाडू आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या 100 शतकांकडे त्याची वाटचाल करत आहे. भारतीय कर्णधार ज्याप्रकारे खेळत आहे तो शतकांच्या मागे शतक ठोकत आहे, असे दुसून येते की तो लवकरच सचिनचा विक्रम मोडेल.

विराटच्या 42 व्या एकदिवसीय शतकानंतर सचिन तेंडुलकर म्हणाला, “जर विराट कोहलीने माझा 100 शतकांचा विक्रम मोडला तर मी त्याच्या जवळ जाईन आणि त्याच्यासोबत शॅम्पेन शेअर करीन.” विराट कोहलीने त्रिनिडाड एकदिवसीय मालिकेत 42 वे वनडे शतक झळकावताना सचिन तेंडुलकरचा एक विश्वविक्रम मोडला. विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध 8 वेळा शतक ठोकले आहे. श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीने 8 किंवा त्याहून अधिक शतके ठोकली आहेत. विराट तीन देशांविरुद्ध 8 किंवा त्याहून अधिक शतके ठोकणारा पहिला खेळाडू आहे. या अगोदर सचिनने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकाविरूद्ध हा पराक्रम केला होता.

विराट कोहली हा वनडे मध्ये कोणत्याही एका संघाविरूद्ध सर्वाधिक शतके ठोकणारा कर्णधार बनला आहे. कर्णधार म्हणून विराटने 6 शतके केली आहेत. यापूर्वी रिकी पाँटिंगने न्यूझीलंडविरुद्ध 5 शतके केली होती. त्याचबरोबर आता एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा कोहली आता आठव्या क्रमांकावर आला आहे. त्याने 11363 धावा असलेल्या गांगुलीला मागे सोडले आहे. कोहलीने आता 238 सामन्यांमध्ये 59.71 च्या सरासरीने 11406 धावा केल्या आहेत. त्याने 42 शतके आणि 54 अर्धशतके आहेत. एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर असून त्याने 463 एकदिवसीय सामन्यात 18426 धावा केल्या आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: