मुंबई : सांगली, कोल्हापूर, कोकण येथे पूर परिस्थिती भयानक असून तेथील पूरग्रस्तांच्या पुनर्वसन कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. त्यातच आज सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा उमेदवार संजयमामा शिंदे यांनी 11 लाख तर आमदार बबनदादा 10 लाख लाख रुपये रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सुपूर्द केली.
सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व संजय शिंदे यांचे बंधू बबनदादा यांनी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व विठ्ठराव शिंदे साखर कारखान्याच्या वतीने 10 लाख 4 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री निधीसाठी फडणवीस यांच्या कडे दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुक व ट्विटरवर फोटो प्रसिद्ध करून शिंदे बंधूंचे
या मदतीबद्दल आभार मानले आहेत.
शिंदे बंधूच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला .?
दरम्यान आमदार बबन शिंदे हे भाजप प्रवेश करणार असून भाजपा कडूनच विधानसभा लढवतील अशी चर्चा आहे.विशेष म्हणजे यावेळी हे दोघे बंधुच नव्हते तर बबन शिंदे यांचे पुत्र जि प.सदस्य रणजीत शिंदे हे देखील हजर होते. त्यामुळे बबन दादा मुलाला उभा करणार असे ही दिसत आहे. तर बंधू संजय शिंदे करमाळा विधानसभा निवडणूक भाजप सेना युती नाही झाली तर भाजपकडून लढवतील, त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत अशी ही चर्चा आहे. पुराग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मदत न करता त्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाठल्याने अनेक राजकीय चर्चांना उत आला आहे