: आजचे पंचांग – Today’s Horoscope 17 August 2022
बुधवार.
17.08.2022
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – अश्विनी 21.57 पर्यंत नंतर भरणी.
चंद्र राशी – मेष.
________________________
आजचे राशीभविष्य – Today’s Horoscope 17 August 2022
मेष – ( शुभ रंग – पिस्ता )
एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज आपल्या जोडीदाराचे हट्ट पुरवण्यास प्राधान्य द्याल. वादविवादात आज आपल्याच मतावर ठाम रहाल.
वृषभ -(शुभ रंग- जांभळा)
काम धंद्यात काही अनपेक्षित अडचणी येण्याची शक्यता आहे. घरातील वडीलधारी मंडळी आज आपलेच खरे करतील. मोठ्या आर्थिक उलाढाली आज नकोत.
मिथुन-( शुभ रंग- मोरपिशी)
आज पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे. जीवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. आज वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण राहील.
कर्क-( शुभ रंग -डाळिबी)
आपल्या सडेतोड बोलण्याच्या वृत्तीमुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. घराबाहेर वावरतांना डोके थंड व वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक कामे सोपी होतील.
सिंह-( शुभ रंग- सोनेरी)
कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. थोडा संयम ठेवा. गृहिणींना अति श्रमामुळे थकवा जाणवेल. भक्तीमार्गात असणार्यांना एखादी प्रचिती येईल.
कन्या – ( शुभ रंग- चंदेरी)
कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. काही मानापमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागू शकते. महत्वाच्या चर्चा बैठकी आज टाळलेल्या बऱ्या.
तूळ – (शुभ रंग- गुलाबी)
आजचा दिवस धावपळीत जाईल एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. दूरच्या प्रवासात थोडा खोळंबा होईल.मामा मावशी यांच्याकडून काही सुवार्ता येतील.
वृश्चिक- ( शुभ रंग- राखाडी)
दैनंदिन कामे आज सुरळीत पार पडतील. गरजेइतका पैसाही उपलब्ध होईल. प्रेम प्रकरणे मात्र डोक्याला मनस्ताप देतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या चुका काढू नका.
धनु- ( शुभ रंग- क्रीम)
कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहिणी आपल्या आवडत्या छंदास आवर्जून वेळ देतील. रुग्ण ठणठणीत बरे होतील. उच्चशिक्षितांच्या महत्वाकांक्षा वाढतील.
मकर – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
वास्तु किंवा वाहन खरेदीसाठी कर्ज मंजूर होईल. आज तुम्ही जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वास्तुमध्ये एखादे धार्मिक करण्याचे बेत आखाल.
कुंभ – (शुभ रंग- मोतिया)
कार्यक्षेत्रात हितशत्रूंच्या उपद्रव वाढणार आहे. बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे कुसंगत टाळावी
मीन- ( शुभ रंग- मरून)
आज सर्व दृष्टीने अनुकूल असा दिवस असून दैनंदिन कामे विना व्यत्यय पार पडतील. नव्या ओळखीतून व्यवसायवृद्धी होईल. संध्याकाळी सहकुटुंब चैन कराल.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन 9689165424
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)