गणेश भोळे
बार्शी: असल्या कडक उन्हाळ्याच्या दिवसात एयर कंडिशनर मध्ये बसणाऱ्या व्यक्तींचे हलाहल होत असताना अशा परिस्थितीत व असल्या उन्हात ही व्यक्ती जिचा कोणताही पत्ता नाही किंवा कोणी वारस नाही गेल्या 8 ते 9 दिवस उन्हात होरपळत असताना माणूस म्हणून किंवा संघटना म्हणून कोण्या एकही व्यक्तीचा किंवा एकाही सामाजिक संघटनेचा डोळा या माणूस म्हणून घेणाऱ्या व्यक्तीकडे गेला नाही.8 ते 9 दिवसापासून विना अन्नाचा हा माणूस जगावेगळा पडला असताना ओलीस पडला असताना या माणसाच्या मदतीला म्हणा किंवा न बोलता देणाऱ्या हाकेला साथ म्हणून आमची सामाजिक संघटना असणारी ऊडान फाउंडेशन या पण वेळेस गरिबांच्या वंचितांच्या मदतीला धावून अली.वास्तविक परिस्थिती पाहता त्या गरीब माणसाच्या अंगावर पूर्ण अंग झाकेलं अस कोणतेही वस्त्र न्हवते,डोक्यावरील केस लांबपर्यंत वाढलेले दाढी चे केस वाढलेले किंवा कोणी जवळ येईल असं कोणतेही व्यक्तिक स्वछता न्हवती आशा परिस्थितीत ऊडान फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्याना हे समजल्यानंतर फाउंडेशन चे पदाधिकारी त्या ठिकाणी येऊन त्या व्यक्तीस पूर्ण स्वच्छ करून दाढी कटिंग करून व त्या व्यक्तीस नवीन कपडे देऊन तू पण आमच्या सारखाच आहेस ही भावना त्या व्यक्तीच्या मनात निर्माण केली गेली.आपली संघटना व आपले संघटनेच्या कार्याची जबाबदारी झेलत त्या व्यक्तीस संघटना म्हणून आपल्या ऊडान फाउंडेशन च्या माध्यमातून योग्य न्याय दिला.ऊडान फाउंडेशन ही संघटना यांसारख्या कामासाठीच प्रचिलीत आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं
उपाध्यक्ष इलियास शेख,वसीम मुलानी,अयाज जहाँनपुरे,वसीम पठान ,गौस शेख हे उपस्थित होते