येदियुरप्पा आज सायंकाळी 6 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

बंगळुरू । भाजपा नेता बीएस येदियुरप्पा यांनी शुक्रवारी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. याशिवाय त्यांनी आजच शपथविधी होऊ देण्याची विनंती केली. राज्यपालांच्या भेटीनंतर येदियुरप्पांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली. येदियुरप्पा आज सायंकाळी 6 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.


23 जुलै रोजी कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामींना बहुमत सिद्ध करता आले नव्हते. काँग्रेस-जेडीएस आघडीचे हे सरकार फक्त 14 महिन्यांतच कोसळले.

येदियुरप्पा सत्तास्थापनेसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून संमतीची वाट पाहत होते. स‌त्तास्थापनेच्या रणनीतीवर चर्चेसाठी बुधवारीच कर्नाटक भाजप नेत्यांच्या प्रतिनिधी मंडळाने गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे कार्यकारी जे.पी. नड्डा यांची भेट घेतली होती. यात भाजपे नेते जगदीश शेट्टार आणि अरविंद लिम्बावली यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता.

मंत्रिमंडळाची नियुक्ती येदियुरप्पांसाठी आव्हानात्मक

भावी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्यासाठी मंत्रिमंडळाची नियुक्ती सर्वात आव्हानात्मक राहील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 15 बंडखोरांसहित 56 आमदार असे आहेत, ज्यांनी 3 पेक्षा जास्त निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. या सर्वांनाच नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची अपेक्षा आहे. परंतु, कर्नाटकात मुख्यमंत्र्यांसह केवळ 34 पदेच स्वीकृत आहेत. तथापि, येदियुरप्पा मात्र बंडखोरांसह या ज्येष्ठांनाही नाराज करू इच्छित नसल्याचे वृत्त आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: