अकलूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकलूज दौऱ्यात माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती उत्तम जानकर यांनी एकत्रितपणे मोदी यांचा सत्कार केल्याने गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले राजकीय वैरत्व संपले असल्याचे बोलले जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या पुढाकाराने माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील व जानकर यांच्यातील राजकीय वैरत्व संपविले . माजी खा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कोल्हापुरी फेटा तर माजी उपसभापती उत्तमराव जानकर यांनी घोंगडी देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार अकलूज मध्ये सत्कार केला .