आर्थर रोड जेलमध्ये भयंकर प्रकार समोर आला असून एका पुरुष कैद्याने दुसऱ्या पुरुष कैद्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी पीडित कैद्याने तुरुंग प्रशासनाकडे तक्रार दिली. त्यानंतर ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात आरोपी कैद्याविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सम्रो आलेल्या माहितीनुसार आर्थर रोड जेलमध्ये 14 मे रोजी ही घटना घडल्याची माहिती आहे. घटनेच्या एका दिवसानंतर पीडितेने याबाबत सांगितले. एनएम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात 19 वर्षीय कैद्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 वर्षीय कैद्याने या प्रकरणी तक्रार दिली होती. ‘आज तक’ वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर यासंदर्भात बातमी देण्यात आली आहे.
या प्रकरणी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला आर्थर रोड जेलमधील जेलरने या घटनेची माहिती देण्यासाठी फोन केला. त्याने सांगितले की, आरोपीने पीडित कैद्याची पॅंट उघडली आणि त्याच्यावर जबरदस्ती केली. पीडित तरुणाने त्याला विरोध केला. पीडितानेच ही माहिती अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर कारागृह अधीक्षकांनी आम्हाला माहिती दिली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.