मनात खूप वेदना आहेत, माझा मित्र अरुण मला सोडून गेला – पंतप्रधान मोदी

मनात खूप वेदना आहेत, माझा मित्र अरुण मला सोडून गेला – पंतप्रधान मोदी

ज्या मित्रासोबत मी हा मोठा प्रवास केला. ते माझे मित्र अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे.

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पहिल्यांदाच बहरीन येथे पोहोचले. तेथे नॅशनल स्टेडिअरमध्ये त्यांनी भारतीय समुदायातील लोकांना संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली. अरुण जेटली यांच्याबद्दल बोलताना मोदी भावूक झाले. ते म्हणाले की, ‘मला अनेक कर्तव्य आहेत. एका बाजूला बहरिनमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. देश कृष्णजनमाष्टमीचा उत्सव साजरा करत आहे. मात्र यावेळी माझ्या मनात तीव्र दु:खाची भावना आहे. विद्यार्थी दशेपासून ज्या मित्रासोबत पाऊल टाकले. एकत्र राजकीय प्रवास केला. स्वप्ने पाहिली आणि ती पूर्ण केली. ज्या मित्रासोबत मी हा मोठा प्रवास केला. ते माझे मित्र अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. ते मला सोडून गेल्याचे खूप दुःख होत आहे.

अबूधाबीमधील आपला दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी बरिनमध्ये रवाना झाले आहेत. फ्रान्समधील पॅरिसमध्ये भारतीय नागरिकांना संबोधित केल्यानंतर शनिवारी मोदींनी बहरिनमधील भारतीय नागरिकांशी संवाद साधत होते. दरम्यान बहरिनमधील भारतीय नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जोरदार स्वागत केले. याठिकाणी करण्यात आलेल्या स्वागतामुळे मला भारतामध्ये असल्यासारखे वाटत असल्याचे म्हणत त्यांनी भारतीय वंशाच्या नागरिकांची मने जिंकली. सरकार फक्त स्टेअरिंगवर आहे. खऱ्या अर्थाने देशाच्या जनतेच्या हातीच एक्सेलेटर असल्याचेही, यावेळी मोदी म्हणाले.

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्याविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी कल्पना करु शकत नाही. मी खूप दूर आहे आणि माझा मित्र मला सोडून गेलाय. या ऑगस्ट महिन्यात काही दिवसांपूर्वी माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज गेल्या. आज माझा मित्रही अरुण मला सोडून गेला. माझ्या मनात दुविधा आहे. एका बाजूला कर्तव्य आहे. तर दुसऱ्या बाजूला मैत्रीच्या आठवणी माझ्या मनात आहेत. मी आज बहरीनमधून अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहतो त्यांना नमन करतो. या दु:खद प्रसंगात ईश्वर त्यांच्या कुटुंबाला शक्ती देवो ही प्रार्थना करतो असे मोदी म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: