सोलापूर – भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांचा राजीनामा मंजूर करीत आज मुंबई येथे झालेल्या भाजपच्या महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सोलापूरच्या नूतन शहराध्यक्षपदी विक्रम देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
प्रा. निंबर्गी यांनी राजीनामा दिल्यानंतर काल सोलापूरातील भाजप कार्यालयात त्यांच्या समर्थकांनी निंबर्गी यांचा राजीनामा मंजूर करु नये यासाठी उपोषण केले होते.
यावेळी पक्षातील मालकशाही विरोधात घोषणाबाजीही करण्यात आले होते. शेवटी महापौर बनशेट्टी यांनी भाजप पक्ष कार्यालयात उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याबाबत आवाहन केले.
नूतन शहर अध्यक्ष पदासाठी माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी आणि विक्रम देशमुख यांच्या नावाची चर्चा होती. आज मुंबई येथे झालेल्या भाजपच्या महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नूतन शहर अध्यक्षपदी विक्रम देशमुख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.