बी एस एडीयुरप्पा आज विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार,सकाळच्या हेडलाईन

खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन
वृत्तसंकलन : गुरुराज माशाळ

🛎 नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने टेरर फंडिंग प्रकरणी बारामुल्ला जिल्‍ह्‍यातील चार ठिकाणी छापा टाकला. सूत्रांच्या माहितीनुसार, एनआयएच्या टीमने उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील चार व्यापारांच्या घरावर छापा टाकला. यावेळी तपास पथकाच्या हाती काही कागदपत्रे लागली असून या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.

🛎 नवी दिल्ली : बुलेट ट्रेनचे काम सन 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत लेखी उत्तरादाखल दिली. डॉ. विकास महात्मे यांनी यासंदर्भातील प्रश्‍न उपस्थित केला होता.

🛎नवी दिल्ली: देशभरात हेपेटायटिसच्या नियंत्रणासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार असून २०३० पर्यंत देशातून हेपेटायटिसचे समूळ उच्चाटन करण्यात येईल – केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे

🛎नवी दिल्ली : भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून भारताचा ऑफ स्पिनर हरभजनसिंहचं खेलरत्न तर धावपटू द्युती चंदचं नाव अर्जुन पुरस्कारासाठीच्या यादीतून रद्द करण्यात आले आहे. दोघांचा अर्ज दिलेल्या मुदतीत क्रीडा मंत्रालयाकडे दाखल न झाल्याने त्यांचा या पुरस्कारासाठी विचार केला जाणार नाही.

🛎 मुंबई : देशात वर्ष २०१४ नंतर वाघांच्या संख्येत ४०० ने वाढ झाली आहे. ही वाढ १८ ते २० टक्के इतकी आहे. २०१४ मध्ये देशात २ हजार २२६ वाघ होते. जाणकारांनी देशातील वाघांची संख्या २ हजार ६०० इतकी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

🛎मुंबई : संदीप नाईक हे राष्ट्रवादीमध्येच राहणार, कुणीही पक्ष सोडून जाणार नाही. ही निव्वळ एक अफवा आहे; तर या उलट नवी मुंबईतील शिवसेनेचे 12 नगरसेवक हे संदीप नाईक यांच्या संपर्कात असून ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेण्यास इच्छूक असल्याचंही माहिती संदीप नाईक यांच्या एका जवळच्या कार्यकर्त्याने दिली.

🛎 बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या सरकारला आज विश्वास मताला सामोरे जावे लागणार आहे, भाजपला बहुमतासाठी जादुई संख्या 105चा आकडा गाठणे आवश्यक आहे.

🛎नागपूर : शरद पवारांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे, कुणावर दबाव टाकून पक्षात घ्यावं, अशी भाजपची स्थिती सध्यातरी नाही. उलट आपले नेते पक्ष सोडून का जात आहेत? याचं शरद पवारांना आत्मचिंतन करावं, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.

🛎पुणे : फळविक्री व्यवसायात नुकसान झाल्याने झालेल्या पती- पत्नीच्या वादात पत्नीने स्वतःच्या पोटच्या तीन मुलींच्या हत्या करून स्वतः फास लावून आत्महत्या केल्याची घटना भोसरीत घडली आहे, या घटनेमुळे भोसरीत खळबळ उडाली आहे.

🛎 सातारा : शिवेंद्रराजे यांनी स्वतःच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर सूचक विधान केली आहे, ज्या पक्षामध्ये जनतेच्या विकासाचे हित असेल आणि जो पक्ष मोठा असेल त्या पक्षात मी प्रवेश करणार. जनता जे ठरवेल, त्यावर माझे पाऊल असेल, असे त्यांनी म्हंटले आहे.

🛎 औरंगाबाद : “वबआ” भाजपच्या ‘बी -टीम’ कसे याची आधी खुलासा काँग्रेसने करावा, काँग्रेसला आम्ही 40 जागांची ऑफर दिली असून जो पर्यंत “वबआ” राज्यातील 288 जागांची घोषणा करत नाही तो पर्यंत ही ऑफर राहील अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे.

🛎अहमदनगर : अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील प्रलंबित साकळाई पाणी योजनेचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद यांनी ही योजना तातडीने मंजूर न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

🛎 कोल्हापूर : राज्यातील 250 घराण्यांनी राज्याला वर्षानुवर्षे लुटली आहे, येणारे सरकार हे मजबूत सरकार असणार आहे. यामुळे ज्यांनी राज्याला लुटलं त्यांची सुटका कशी काय होणार, त्याची हिशेब चुकते करावीच लागणार आहेत असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे.

🛎सोलापूर : गेल्या काही निवडणुकीत मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळाली असती तर सोलापूर शहरात एमआयएम फोफावली नसती; असा दावा माजी महापौर यु.एन. बेरिया यांनी केली आहे, त्या बरोबर शहर मध्यचे आमदार प्रणिती शिंदे यांनी शहर मध्य मतदार संघावरील दावा सोडून मोहोळ येथून निवडणूक लढवावी अशी मागणी बेरिया यांनी केले आहे.

🛎पंढरपूर : निरेच्या खोर्‍यात सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरण ९० टक्केपेक्षा जास्त भरले असून दक्षतेचा उपाय म्हणून वीर धरणामधून रविवारी ४ वाजल्यानंतर ४ हजार ५०० क्युसेक्स वेगाने निरा नदीत पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

🛎मंद्रूप : पावसाळा सुरू होऊन दोन महिने संपत आले तरी अंत्रोळी गावचा पाणी प्रश्न सूटत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकली आहे. येत्या दोन दिवसात महसुल विभागाने उपाय योजना न केल्यास तलाठी कार्यलयाला कुलूप ठोकण्याचा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: