‘भाच्चा मराठवाड्याचा, तुमच्या माझ्या हक्काचा’ म्हणत माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांनी मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवारला विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
डॉ. पाटील यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंट वरून एक पोस्ट व्हायरल करून आपल्या मराठवाडयाचा भाच्चा पार्थ अजितराव पवार मावळमधून संयुक्त पुरोगामी महाआघाडी कडून उभा आहे. या मतदारसंघात आपल्या जिल्ह्यासह मराठवाड्यातील खूप मोठ्या संख्येने मतदार बांधव आहेत.
आपल्या समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी तसेच अडचणीच्या काळात नेहमीच मदतीला धावून येणारा हक्काचा माणूस खासदार असावा यासाठी येत्या २९ तारखेला घड्याळ समोरील बटन दाबून आपला भाच्चा पार्थ अजितराव पवार यास विक्रमी मतांनी विजयी करावे असे मराठवाडा भागातील तमाम मतदारांना डॉ पाटील यांनी नम्र आवाहन केले आहे