पंजाबमध्ये 90 हजार NRI ना कोरोना लागण झाल्याचा संशय, 150 कोटींच्या निधीची मागणी

देशात दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत आहे. आतापर्यंत 450 हून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. तसेच आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान पंजाबमध्ये 90 हजार NRI आले आहेत. पंजाबचे आरोग्य मंत्री बलवीर सिद्धू यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहून ही माहिती दिली आहे.

या महिन्यात 90 हजार NRI पंजाबमध्ये आले आहेत. बहुतांश NRIने आपल्या ओळखीच्या लोकांच्या मदतीने लपून बसले आहेत. त्यांच्यामध्ये कोरोनाचे लक्षण असू शकतात असा अंदाज राज्य सरकारने व्यक्त केला आहे. पंजाबमध्ये डॉक्टर, व्हेंटिलेटर आणि इतर आरोग्य सुविधा पुरवण्याची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे.

कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी पंजाब सरकारने केंद्र सरकारकडे 150 कोटी रुपयांचा निधी मागितला आहे. पंजाबमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 23 रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

देशातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत 480 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता महाराष्ट्र, पंजाबमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड, जम्मू कश्मीर, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, नागालँण्ड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये 31 मार्च पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: