निर्भयाच्या आरोपींना 20 मार्चला होणार फाशी,आरोपींच्या सर्व पळवाटा संपल्या

2012 च्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी चार नराधम गुन्हेगारांविरुद्ध नवे डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. 20 मार्चला पहाटे 5.30 वाजता तिहार तुरुंगात चार नराधमांना फासावर लटकवले जाणार आहे.

बुधवारी दोषी पवन गुप्ता (convict Pawan Gupta) याची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली होती. त्यामुळे चारही दोषींना लवकरच फासावर लटकवले जाणार यावर शिक्कामोर्तब झाला होता. अखेर दोषींविरोधात गुरुवारी दुपारी अडीच वाजता चौथे डेथ वॉरंट जारी करण्यात आले.

2012 मध्ये घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ता याची क्यूरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने 2 मार्च रोजी फेटाळली होती. या याचिकेद्वारे त्याने फाशीची शिक्षेचे रुपांत जन्मठेपेमध्ये करण्यात यावे अशी विनंती न्यायालयाला केली होती. 2 मार्चला सकाळी झालेल्या सुनावणीवेळी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली. त्यानंतर 3 मार्चला फाशी देण्यासाठी काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटला स्थगिती देण्यात न्यायालयाने नकार दिला होता. 4 मार्चला राष्ट्रपतींनी दोषी पवनची दया याचिका फेटाळली.

राष्ट्रपतींकडे दया याचिका

सर्वोच्च न्यायालयाने क्येरेटिव्ह याचिका फेटाळल्यानंतर दोषी पवन गुप्ता याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका दाखल केली होती. राष्ट्रपती या याचिकेवर निर्णय घेईपर्यंत न्यायालयाने डेथ वॉरंटला स्थगिती द्यावी असा युक्तीवाद दोषींचे वकील ए.पी. सिंह यांनी केला. यावर तिहार प्रशासनाने न्यायालयात सांगितले की, आता न्यायाधीशांची कोणतीही भूमिका यात नाही. राष्ट्रपती आमच्याकडे अहवाल मागती, तोपर्यंत दोषींना फाशी देणे थांबवले जाईल. यावेळी न्यायालयाने दोषींच्या वकिलाला तुम्ही आगीशी खेळ खेळत आहात, असे म्हणत फटकारले देखील होते.

पटियाला हायकोर्टाबाहेर निदर्शनं

निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवण्यास उशिर होत असल्याने नागरिकांनी पटियाला हायकोर्टाबाहेर निदर्शनं केली. नागरिकांनी पोस्टर झळकावत चारही नराधमांना फासावर लटकावण्याची मागणी केली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: