देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 1004, महाराष्ट्रात सर्वाधिक 186 रुग्ण

नवी दिल्ली |देशभरात कोरोना विषाणूचे प्रमाण सतत वाढत आहे. आतापर्यंत देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक हजारच्या पुढे गेली आहे. देशात आता कोरोनाचे 1004 रुग्ण झाले आहेत. यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला आहे. आणि 84 रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्या भागात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्या भागात सरकारचे लक्ष आहे आणि या व्यतिरिक्त, संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांना शोधण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गेल्या 24 तासांत दोन मृत्यूसह 149 नवीन घटना घडल्या आहेत. देशातील कोरोना व्हायरसच्या सद्यस्थितीबद्दल माध्यमांची माहिती देताना ते म्हणाले की सामाजिक सलोखा कमी करण्यासाठी आणि शंभर टक्के बंदी सुनिश्चित करण्यासाठी संयुक्त प्रयत्न केले जात आहेत. अग्रवाल म्हणाले की, ज्या भागात या आजाराची सर्वाधिक प्रकरणे घडली आहेत अशा ठिकाणी सरकार आपले लक्ष केंद्रीत करीत आहे. राज्यांसह, संक्रमित व्यक्तींचे संपर्क शोधणे, समुदाय देखरेख ठेवणे आणि या रोग प्रतिबंधक धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे काम केले जात आहे.

महाराष्ट्रात संक्रमित रुग्णांची संख्या सर्वाधिक 186 आहे. तर केरळ 182 बाधित रुग्णांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. कोरोना विषाणू सध्या भारतात दुसर्‍या टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे.

कोणत्या राज्यात किती मृत्यू झाले?

आतापर्यंत महाराष्ट्रात 04, गुजरात आणि कर्नाटकमधील 03, मध्य प्रदेशात 02 आणि तामिळनाडू, बिहार, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात प्रत्येकी 1 – 1 जणांचा मृत्यू झाला आहे. या आजारापासून मुक्त झालेल्या नागरिकांची संख्या बघितल्यास महाराष्ट्रात 19, केरळ, यूपी आणि हरियाणामध्ये 11 – 11, कर्नाटकमधील 05, राजस्थानात 03, दिल्लीत 06, तामिळनाडूमधील 02 लडाखमधील 03 रुग्ण या आजारापासून बरे झालेले आहेत. तसेच पंजाब, तेलंगणा, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, प्रत्येकी 1 – 1 रुग्ण बरे झाले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: