दहशतवादाविरोधात फ्रान्स भारतासोबत, मॅक्रो म्हणाले- काश्मीरप्रकरणी तिसऱ्याने नाक खुपसू नये

अमेरिकेने अनेक वेळा काश्मीर प्रकरणी भारत पाकमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

नवी दिल्ली | फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅुएल मॅक्रो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात गुरुवारी द्विपक्षीय चर्चा झाली. यानंतर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुअल मॅक्रो म्हणाले की, काश्मीरप्रकरणी कोणत्याही तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करु नये. हा भारत आण पाकिस्तानचा मुद्दा आहे. अमेरिकेने अनेक वेळा काश्मीर प्रकरणी भारत पाकमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र फ्रान्सचे राष्ट्रपती म्हणाले की, कोणत्याही देशाने यामध्ये हस्तक्षेप करु नये आणि लोकांना भडकावण्याचे काम करु नये.

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुअल मॅक्रो म्हणाले की, भारत आणि फ्रान्सची भागीदारी आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर महत्त्वाची भूमिका निभावते. या दोन देशांमध्ये खूप विश्वास आणि हा विश्वास सहज मिळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी काश्मीर विषयावर बातचीत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला काश्मीरच्या परिस्थितीविषयी माहिती दिली. भारत आणि पाकिस्तानने मिळून यावर उपाय कढावा असे मी त्यांना सांगितले आहे.

फ्रान्सचे राष्ट्रपती पुढे म्हणाले की, कोणत्याही तिसऱ्या देशाने या विषयात हस्तक्षेप करु नये आणि हिंसा भडकावण्याचे काम करु नये. काश्मीरमध्ये स्थैर्य निर्माण होणे गरजेचे आहे. काही दिवसांमध्ये मी पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत बातचित करणार आहे. कोणत्याही ठिकाणी दहशतवादाची घटना घडू नये असे मला वाटते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: