त्या मुलीसाठी सुप्रिया सुळेंचा पोलीस स्टेशनवर मोर्चा !

घनसावंगी तालुका, जालना इथे राहणाऱ्या एका १९ वर्षीय मुलीवर मुंबईतील चेम्बूर परिसरात चार नरधमांनी अमानुष बलात्कार केला. या पीडितेची महिनाभर मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज बुधवारी अखेर संपली. या घटनेला एक महिना उलटूनही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे या मैदानात उतरल्या असून पीडित मुलीला न्याय मिळाला यासाठी त्या शुक्रवारी मोर्चा काढणार आहेत.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या फेसबुक पेजवर माहिती दिली आहे यात म्हटले आहे की,पोलिस प्रशासन काय करत आहे? पीडीतेला न्याय कधी मिळणार? या प्रश्नांसह खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आणि मुंबई विभागीय अध्यक्ष नवाब मलिक यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निषेध मोर्चा शुक्रवार, दिनांक ३० ऑगस्ट, सकाळी ११ वाजता लाल डोंगर ते चुनाभट्टी पोलीस ठाणे इथे निघणार आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: