जूलै 2021 पर्यंत दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडर स्मारकाचे काम पूर्ण होणार-मुख्यमंत्री,खबर जगाची

वृत्तसंकलन : गुरुराज माशाळ

जम्मू काश्मीर : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सलग दुसऱ्या दिवशीही केला ग्रेनेड हल्ला; 10 नागरिक जखमी.

जपान : जपानमधील होन्शू बेटावर ६.५ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के; यामागाता, निगाता आणि नोतो भागात त्सुनामीचा इशारा.

उत्तराखंडः केदारनाथ येथे ऑक्सिजनच्या कमतरेतमुळे मुंबईतील एका व्यक्तीचा मृत्यू; संपामुळे हेलिकॉप्टर सेवेदारांनी सेवेस दिला नकार.

दिल्लीः लोकसभा अध्यक्षपदाचे उमेदवार ओम बिर्ला यांना काँग्रेसचा पाठिंबा; अधीर रंजन चौधरी यांची माहिती.

दिल्लीः टीएमसी आमदार बिस्वाजीत दास यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश.

नवी दिल्ली : खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला केंद्र सरकारला घरचा आहेर; राम मंदिर बांधण्यास मोदी सरकारच उशीर करत असल्याचे केला विधान.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत २०१९-२० या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर; अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारकडून कृषी, सिंचन यावर भर देत अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या.

मुंबई : 8 जूलै 2021 पर्यंत दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडर स्मारकाचे काम पूर्ण होणार, विधानसभेतील प्रश्नोत्तर दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेखी माहिती.

मुंबई : नागपूर आणि मुंबईमध्ये हेल्मेटवर कारवाई केली जाते त्याचप्रमाणे पुण्यातही तंत्रज्ञानाचा वापर करून सीसीटीव्हीच्या सहाय्यानं कारवाई करा – नागरिकांना चलन त्यांच्या ऑफिस किंवा घरी पाठवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश.

मुंबई : अकरावी प्रवेशासाठी वाढीव जागा देणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी काल (मंगळवारी) विधानसभेत केली.

मुंबई : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात सादर होण्यापूर्वीच फुटला असल्याचा आरोप विरोधकांनी केला. अर्थसंकल्प ट्विटरवर फुटण्याच्या आरोपाचं मुख्यमंत्र्यांकडून खंडन, नवीन तंत्रज्ञान आणि नवीन माध्यमांचा अंगीकार करण्याचा विरोधकांना सल्ला.

पुणेः ‘पीएनजी ब्रदर्स’ फसवणुकीप्रकरणी ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता मिलिंद दास्ताने यांना २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी.

भंडारा : जिल्ह्यातील साकोली तालुक्यात (मंगळवारी) झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू ; पाच जखमी.

मँचेस्टर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने अफगाणिस्तान विरुद्ध षटकारांची केली बरसात. भारताचा सिक्सर किंग रोहित शर्माचा नावावर असलेल्या 16 षटकारांच्या विक्रम काढलं मोडीत.

धिरज करळे: