चांद्रयानापासून आज वेगळा होणार लँडर ‘विक्रम’, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार

3 सप्टेंबर रोजी आम्ही काही सेकंदांसाठी इंजिनाची चाचणी घेऊन लँडरमधील प्रणाली व्यवस्थित चालू आहे की नाही याची चाचपणी करणात आहोत

नवी दिल्ली | भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पाठवलेले ‘चांद्रयान-2’ आपले काम यशस्वीरित्या पार पडत आहे. आता चांद्रयान-2 चे चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण सुरू आहे. ‘चांद्रयान-2’ ने या प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा केला आहे. चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. यानंतर आता एक महत्त्वाचा टप्पा चांद्रयान 2 पार पाडणार आहे.

मंगळवारी चांद्रयान -2 यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत दाखल झाल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली होती. आता आता इस्रोने चांद्रयानाला चंद्रावर उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. आज चांद्रयानापासून लँडर ‘विक्रम’ वेगळा होणार आहे.  7 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजून 55 मिनिटांनी विक्रम हा चंद्राच्या पृष्टभागावर लँड करणार आहे. 

सोमवारी दुपारी 12 वाजून 45 मिनिटे ते एक वाजून 45 मिनिटे या कालावधीत ‘विक्रम’ लँडर मुख्य यानापासून वेगळा होणार आहे. ‘चांद्रयान-2’ यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत दाखल झाले. यानंतर इस्रोच्या प्रमुखांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी आतापर्यंतच्या मोहिमेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मोहिम यशस्वीरित्या पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले होते.

तसेच मोहिमेतील पुढील टप्प्यांविषयीही त्यांनी माहिती दिली. ”या मोहिमेतील पुढील महत्त्वाचा टप्पा 2 सप्टेंबर रोजी येईल. त्यादिवशी लँडर विक्रम हा ऑर्बिटरपासून वेगळा होईल. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी आम्ही काही सेकंदांसाठी इंजिनाची चाचणी घेऊन लँडरमधील प्रणाली व्यवस्थित चालू आहे की नाही याची चाचपणी करणात आहोत.” असे सिवन म्हणाले होते.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ ग्लोबल मीडिया सोल्युशन्स .

ग्लोबल न्युज नेटवर्क: