गुगलने अँड्रॉईड फोनमधील 15 मोबाईल अॅप डिलीट केले आहेत. हे अॅप आपल्यासाठी धोकादायक आहेत, असं गुगलने म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून Agent Smith नावाच्या मालवेअरचा धोका अँड्रॉईड फोनवर वाढला आहे.
आतापर्यंत या मालवेअरने 1.5 कोटी अँड्रॉईड फोनला आपला निशाणा बनवला आहे. या मालवेअरने फोनमध्ये पहिल्यापासून असलेल्या अॅपला Malicious च्या सहाय्याने रिप्लेस केले आहे. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसू शकतो. गुगलने प्ले स्टोअरमधून तातडीने हे अॅप हटवले आहेत.
जर तुमच्या फोनमध्ये हे 15 अॅप असतील तर तातडीने डिलीट करा. कोणते 15 अॅप?
Ludo Master – New Ludo Game 2019 For Free
Blockman Go : Free Realms And Mini Games
Crazy Juicer : Hot Knife Hit Game and Juice Blast
Sky Warriors : General Attack
Bio Blast : Infinity Battle Shoot virus
Shooting Jet
Gun Hero : Gunman Game for Free Cooking Witch
Color Phone Flash : Call Screen Theme
Clash of Virus Angry virus
Rabbit Temple Star Range
Kiss Game : Touch Her Heart Girl Cloth Xray Scan Simulator