खासदार सुप्रिया सुळे देशात पुन्हा अव्वल.!

ग्लोबल न्युज नेटवर्क : संसदेत केली जाणारी विविध मुद्द्यांची मांडणी, प्रश्न विचारणे, सभागृहातील चर्चांमधील सहभाग, खासगी विधयेक सादर करणे ,सभागृहातील उपस्थिती आदी निकषांद्वारे संसदेत अभ्यासपूर्ण कामगिरी करणाऱ्या खासदारांचा अहवाल अधिवेशन संपल्यानंतर जाहीर करण्यात येतो.


नुकत्याच संपलेल्या संसदेच्या अधिवेशनात मागील वर्षाप्रमाणे संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या सलग दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत अव्वल ठरल्या आहेत.

सलग तिसऱ्यांदा बारामतीच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळे विजयी झाल्या असून लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात त्यांनी आपली कामगिरी कायम ठेवली आहे़ हे अधिवेशन आॅगस्ट महिन्यात संपले,त्यामध्ये खा़ सुळे यांनी सर्वाधिक चर्चेत सहभाग नोंदवला आहे.

त्यांची तसेच सदस्यांची खासगी बिले यामध्ये राष्ट्रीय सरासरीच्या पुढे आहेत.त्यांची सभागृहातील हजेरी देखील ८८ टक्के एवढी आहे़ पीआरएसच्या आकडेवारीनूसार त्यांनी सर्वाधिक ११० प्रश्न उपस्थित केले. सुळे यांनी कंपनी दुरुस्ती विधेयक, भारतीय पोस्ट आॅफिस दुरुस्ती विधेयक, हुतात्मांच्या कुटुंबाना अर्थिक सहाय्य देय विधेयक, युवा कौशल्य प्रशिक्षण विधेयक यासह चार खाजगी बिले लोकसभेत सादर केली. ही बिले लोकसभेत प्रलंबीत आहेत.


सुळे यांनी स्थानिक, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील महत्वाचे मुद्दे सभागृहात उपस्थित केले. यामध्ये बाल अत्याचार करणाऱ्यांना मृत्यू दंड, पॉक्सो विधेयक,स्मार्ट सिटीज,प्रधानमंत्री आवाज योजना, काश्मीर समस्या, राष्ट्रीय कृषी विकास योजना, पशु कल्याण स्वयंसेवी संस्था, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण, किशोर घरे, ग्रामीण भागातील आरोग्य सुुविधा, इशान्येकडील नूतनीकरणक्षम उर्जा कमतरता, एनआयएमधील मनुष्यबळ,विमातळांवरील सुरक्षा, कोळसा खाणींमध्ये आग, शेतकरी आत्महत्या,आदी महत्वाच्या विषयावरील प्रश्न उपस्थित केले.

ठळक कामगिरी

लोकसभेतील उपस्थिती- ९७ टक्के़ ४५ चर्चासत्रात सहभाग़ यात राष्ट्रीय सरासरी ७़७ तर राज्य ८़१ टक्के आहे़ ११० प्रश्न उपस्थित केले़ यामध्ये राष्ट्रीय सरासरी १८ तर राज्य सरासरी ही ४४ टक्के आहे़ ४ खाजगी बिले मांडली़ त्याची राष्ट्रीय सरासरी ही ०.२ तर राज्य ०.५ आहे़

जनतेने दाखविलेला विश्वास आणि आशीवार्दाच्या बळावर संसदेत जनतेसाठी काम करण्याची संधी मिळत आहे. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव प्रयत्नरत आहे. हा माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचा गौरव आहे.
सुप्रिया सुळे खासदार बारामती

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: