कोरोनाविरूद्धच्या लढाईला अक्षय कुमार चा मदतीचा हात , केंद्र सरकारला दिली 25 कोटींची मदत

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोनाच्या या थैमानामुळे आजवर अनेक देश संकटात सापडले आहे. भारतातही कोरोना व्हायरसने आपले पाऊल ठेवले आहे. कोरोनाबाबत खबरदारी म्हणून केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. यामुळे बरेच लोक अस्वस्थ झाले आहेत. दैनंदिन मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबावर आता उपासमारीचं संकट आलं आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूड स्टार्सनी मदतीचा हात पुढे केला आहे. अभिनेता अक्षय कुमारने सुद्धा केंद्र सरकारला मोठी मदत दिली आहे.

अक्षयकुमारने दिली 25 कोटींची मदत.

अक्षय कुमारने पंतप्रधान मदत निधीत 25 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. त्याबाबत ट्विट करत अक्षयकुमारने म्हंटले आहे की लोकांचे जीवनाला यावेळी मी प्राधान्य देत आहे. आपण शक्य होईल तेवढी मदत केंद्र सरकारला केली पाहिजे. मी माझ्यातर्फे सरकारला मदत म्हणून 25 कोटी रुपये देण्याचे जाहीर करत आहे. “जान है तो जहान है” असं म्हणत अक्षयकुमारने ही मदत जाहीर केली आहे.

अक्षयची मदत करण्याची शैली चाहत्यांची मने जिंकत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याने अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि सर्वांना जागरूक केले आहे. आता अक्षयचा हा उपक्रम कोट्यावधी नागरिकांना दिलासा देणारा ठरणार आहे.

बॉलिवूडने पुढे केला मदतीचा हात

असं असलं तरी अक्षयच्या अगोदर इतर अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दक्षिण स्टार पवन कल्याण यांनी 2 कोटी देण्याची घोषणा केली आहे. त्याच प्रभासने 1 कोटी रुपये देत असल्याचं म्हंटल आहे. कॉमेडी किंग कपिल शर्मानेही 50 लाख रुपयांची मदत केली आहे. हृतिक रोशनने बीएमसीच्या कामगारांना मास्क वाटप करण्याचा पुढाकार घेतला आहे.

या कठीण काळात बॉलिवूडचे देशाबरोबर उभे राहणे आणि प्रत्येक संभाव्य मार्गाने मदत करणे हे कौतुकास्पद पाऊल आहे. कोरोनाच्या संकटावर बॉलिवूड कलाकारांनी केवळ देणगीच दिली नाही तर मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीमदेखील सुरू केली आहे. प्रत्येक कलाकार कोरोनाबाबत व्हिडिओ अपलोड करुन नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: