कलम 370 नंतरचा मोठा निर्णय, मोदी सरकारने प्रसिद्ध केला भारताचा नवा नकाशा!

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर संदर्भातलं कलम 370 हटवल्यानंतर गुरुवारी केंद्र सरकारनं जम्मू आणि काश्मीरचं विभाजन करत त्यातून लेह-लद्दाखला केंद्र शासित प्रदेश म्हणून वेगळ केलं. त्यानंतर गृहमंत्रालयाने देशाचा नवा राजकीय नकाशा प्रसिद्ध केला असून त्यात जम्मू-काश्मीर आणि लेह-लद्दाखला वेगळं दाखविण्यात आलंय.

आता देशात 28 राज्य आणि 9 केंद्र शासित प्रदेश झाले आहेत. 5 ऑगस्टला संसदेने 370वं कलम हटविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तीन महिन्यांनी आता देशाचा नवा राजकीय नकाशा तयार झाला आहे.

जम्मू आणि काश्मीरला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा असला तर पाँडीचेरी सारखी विधानसभाही अस्तित्वात असणार आहे. तर लेह-लद्दाखची स्थिती चंदिगडसारखी असणार आहे. या दोनही राज्यांना स्वतंत्र नायब राज्यपाल राहणार असून त्यांची नियुक्तीही सरकारनं केलीय. गुजरात केडरचे IAS अधिकारी गिरीशचंद्र मुर्मू हे जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल असणार आहेत. तर राधाकृष्ण माथूर हे लेह-लद्दाखचे नायब राज्यपाल असणार आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: