कलम 370; काश्मीरचे महाराजा आणि काँग्रेस नेते कर्णसिंह यांनी ही केले मोदी सरकारच्या निर्णयाचे समर्थन

खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन

वृत्तसंकलन: गुरुराज माशाळ, दुधनी

नवी दिल्ली : जम्मु-काश्मीर संबंधित कलम 370 व 35A रद्द करण्यात आल्या नंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेशी संवाद साधला, या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम 370 हटविण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला. आणि काश्मीर व लडाखमधील जनतेचे आभार मानले.

नवी दिल्ली : मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरला दिलेला विशेष दर्जा म्हणजे कलम 370 हटवले आहे. या मोदी सरकारच्या या निर्णयाचे अनेक नेत्यांनी समर्थन केले आहे. तर आता खुद्द महाराजा हरीसिंग यांच्या मुलगा कर्णसिंह यांनी देखील सरकारने कलम 370 बाबत घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

नवी दिल्ली : जम्मु- काश्मीर मधील कलम 370 हटवल्या नंतर बोखळलेल्या पाकिस्तान सरकारने भारत आणि पाकिस्तान या दोन देशामधील जनतेला जोडणारा समझोता एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : लाखो हिंदूंचा श्रद्धास्थान असलेल्या रामजन्मभूमी अयोध्येच्या वादावर सुरु असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता आठवड्यातून पाच दिवस होणार आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक सुनावणी लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी सरकारने फ्री इंटरनेटची घोषणा केली आहे. दिल्लीत 11 हजार हॉटस्पॉट बसविण्यात येणार असून त्यापैकी 4 हजार हॉटस्पॉट हे शहरातील 4 हजार बस स्टॉपवर बसविण्यात येतील, येत्या 3 ते 4 महिन्यात मोफत वायफाय सुविधेला सुरुवात होईल, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई : राज्यावर भीषण जलआपत्ती आल्याने भाजप- शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांनी आपापल्या यात्रा रद्द केली आहेत. शिवसेनेच्या जनाशिर्वाद यात्रा, भाजपचे महाजनादेश यात्रा, राष्ट्रवादी पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रा रद्द करणायत आले आहेत.

मुंबई : अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या ट्रेड वॉरमुळे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत, सोन्याचा दर प्रतितोळा 38 हजार 470 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दरही प्रतिकिलो 44 हजार रुपये इतका वाढला आहे.

मुंबई: दक्षिण आफ्रिकन क्रिकेटसाठी मोलाचं योगदान देणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा फलंदाज हाशिम आमलानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या अधिकृत क्रिकेट ट्विटर अकाऊंटवरुन नुकतीच याची घोषणा करण्यात आली आहे.

बेळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री यडियुरप्पा यांनी आलमट्टी धरणांतून 5 लाख क्युसेक्स विसर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. हा विसर्ग वाढवल्यामुळे कृष्णा नदीचं पाणी महाराष्ट्रात कमी होऊन सांगलीतील पूर ओसरण्यास मदत होणार आहे.

पुणे : राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीने मदतीचा हात पुढे केला आहे. राष्ट्रवादीचे सर्व खासदार-आमदार एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

पुणे : महापुरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि इतर भागात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. त्यामुळे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 100 टक्के कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

कोल्हापूर : पूरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या कामास जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कोल्हापूरातील आढावा बैठकीत दिली. या बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनातील अधिकारी उपस्थित होते.

लातूर : कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर पिक कापणी प्रयोग केला जातो. त्याप्रसंगी विमा कंपन्यांचे एजंट उपस्थित राहतात. तरी शेतकऱ्यांनीही अधिक जागरुक बनून अशा पीक कापणी प्रयोगांना उपस्थित रहावे, असे आवाहन कृषि मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले.

सोलापूर : वीर व उजनी धरणातून नीरा व भीमा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या पुरात जिल्ह्यातील 133 गावातील 10 हजार 820 हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाली असल्याचे अंदाज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केली आहे.

सोलापूर : मागील पाच महिन्याचं प्रतिक्षे नंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची थकलेल्या 387 कोटी 30 लाख 31 हजार रुपयेइतकी रक्कम शासनाने मंजूर केले असून 31 आगस्ट पर्यंत रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आली आहे.

अक्कलकोट : राज्यातील अनेक जिल्ह्यांत दमदार पाऊस बरसत असताना सोलापूर जिल्हा मात्र कोरडाच आहे. अक्कलकोट शहरासह ग्रामीण भागात केवळ ढगाळ वातावरण आहे. येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: