खबर जगाची
वृत्तसंकलन: गुरुराज माशाळ
नवी दिल्ली : देशात जमावाकडून हत्येच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे; झारखंडच्या घटनेने दु: खी असून या घटनेचा निषेध करतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्ली : एनडीए-1 च्या कार्यकाळात जाहिरातींवर एकूण 5909 कोटींचा खर्च, रेडिओ स्पॉट आणि डिस्प्ले जाहिरातींवर सर्वाधिक खर्च.
मध्य प्रदेश: भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांचा जामीन इंदौर न्यायालयाने फेटाळून लावला.
बंगळुरु : विविध मागण्या घेऊन आलेल्या नागरिकांना कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी लाठीचार्ज करण्याची दिली धमकी.
मुंबई: राज्यातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षण प्रवेशांत १६ टक्के आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा वैध आहे की नाही, याचा फैसला आज दुपारी ३ वाजता होणार.
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राची गरज नाही; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा.
मुंबई : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भूखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिल्याचे आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी काल केली.
मुंबई : क्रिकेट सामन्यावर सट्टा लावल्याप्रकरणी पोलीस उप निरीक्षकालाच अटक; छापेमारीत १ लाख ९३ हजार २०० रुपये आणि सहा मोबाईल फोन केले जप्त.
पुणे: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुणे शहरात आगमन, पावसाच्या सरींनी केले पालखीचे स्वागत.
पुणे : न्यायिक सेवेत असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या गाड्यांवर न्यायाधीश असे लिहू नये; असा सक्त आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एस.पी. तावडे यांनी काढला.
कोल्हापूर: लोकायुक्त विधेयक हिवाळी अधिवेशनात मंजूर होईल; अण्णा हजारे यांची माहिती.
सोलापूर : महिलेचा विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एमआयएमचे शहराध्यक्ष, नगरसेवक तौफिक शेख यास 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी श्रीमती खेडेकर यांनी दिली.
अक्कलकोट : प्रहार शेतकरी संघटनेकडून अक्कलकोट नगरपरिषद समोर गेल्या सोमवारपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू; नगरपालिकेने दाद न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा.