आठवलेंच्या नव्या सभापतींना काव्यात्मक शुभेच्छा; संसदेत मोदी, सोनियांनाही आवरेना हसू

दिल्ली: सध्या संसदेत लोकसभेचं कामकाज सुरु असून नव्या अध्यक्षांची निवडही झाली आहे. लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांचे खासदार रामदास आठवले यांनी आपल्या अनोख्या शैलीतून अभिनंदन केले. आपल्या कवितेतून आठवलेंनी बिर्ला यांचे स्वागत केले. ‘एका देशाचं नाव आहे रोम ,लोकसभेचे अध्यक्ष झाले बिर्ला ओम’ कवितेची ही पहिली ओळ उच्चारताच उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकले. नरेंद्र मोदींचे मन विशाल, राहुल गांधी राहो खुशाल असं म्हणताच मोदींनाही हसू लपवता आले नाही.

आठवलेंनी बिर्ला यांना शुभेच्छा देताना सल्लाही दिला आहे. ओम बिर्ला हे अनुभवी व्यक्ती आहेत. ते कधीच हसत नाहीत. परंतु मी तुम्हाला सभागृहात हसवणार असल्याचे सांगत आठवले यांनी त्यांचे स्वागत केले.

आठवले यांची कविता –
‘एक देश का नाम है रोम, लोकसभा के अध्यक्ष बन गए बिड़ला ओम
लोकसभा का आपको अच्छी तरह चलाना है काम, वेल में आने वालों का ब्लैक लिस्ट में डालना है नाम
नरेंद्र मोदी और आपका दिल है विशाल, राहुल जी आप रहो खुशहाल
हम सब मिलकर एकता की मशाल, भारत को बनाते हैं और भी विशाल
आपका राज्य है राजस्थान, लेकिन लोकसभा की आप बन गए शान
भारत की हमें बढ़ानी है शान, लोकसभा चलाने के लिए आप हैं परफेक्ट हैं मैन’

धिरज करळे: