खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन्स
✍🏽वृत्तसंकलन : गुरुराज माशाळ, दुधनी.
📎 नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विभागांच्या सचिवांची घेतली बैठक; केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, निर्मला सीतारामन आणि जितेंद्र सिंह उपस्थित होते.
📎 नवी दिल्ली : माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्तीची बातमी खोटा असल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून दिली आहे.
📎 नवी दिल्ली : माजी नागरी उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून ८ तास कसून चौकशी.
📎 नवी दिल्ली : फ्रान्सचे परराष्ट्र व्यवहारमंत्री जेबी लिमोयने यांनी घेतली परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट.
📎 मलेशिया : निष्पक्ष सुनावणीसाठी इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकला मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांचा पाठिंबा; योग्य ट्रायल न झाल्यास प्रत्यार्पण न करण्याचा निर्णय.
📎 पुणे : पुण्यात पुढील दोन आकाश अंशतः ढगाळ राहील, दुपारी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता : हवामानशास्त्र विभागाचा अंदाज.
📎 वर्ल्डकपः दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज सामना पावसामुळे रद्द; दोन्ही संघांना १-१ गुण.