अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उत्साह, 900 अंकांनी शेअर बाजारात उसळी


नव्या घोषणेनुसार कंपन्यांसाठी नवीन कॉर्पोरेट कर दर 25.17 टक्के निश्चित

गोवा । अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उत्साह, 900 अंकांनी शेअर बाजारात उसळी. आर्थिक मंदीवर टीकेला तोंड देत केंद्र सरकारने कंपन्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कर कपात जाहीर केली.

जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की आज आम्ही देशी कंपन्या आणि नवीन देशांतर्गत उत्पादन करणार्‍या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कर दर कमी करण्याचा प्रस्ताव ठेवतो.

या नव्या घोषणेनुसार कंपन्यांसाठी नवीन कॉर्पोरेट कर दर 25.17 टक्के निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय कंपन्यांना यापुढे आणखी कर भरावा लागणार नाही.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: