अजित डोवालांचा कश्मिरींसोबत संवाद, वाचा काँग्रेस ने काय दिली प्रतिक्रिया

जम्मू-कश्मीरमधून येणार काँग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांनी कलम 370 रद्द करण्याविरोधात राज्यसभेत थयथयाट केला होता. लोक रस्त्यावर येतील, दंगली होतील असे दावे त्यांच्याकडून करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात असे काहीही घडलेले नाही. खुद्द अजित डोवाल हे देखील कश्मीरमध्ये ठाण मांडून बसले आहेत. ते तिथल्या जनतेशी संवाद साधत आहेत. ही दृश्य काँग्रेसच्या पचनी पडली नाहीत. गुलाम नबी आझाद यांना यासंदर्भात विचारले असता, ”पैसे देऊन तुम्ही कुणालाही सोबत घेऊ शकतात’, अशी गंभीर प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपने काँग्रेसच्या या प्रतिक्रियेचा निषेध केला आहे. ‘गुलाम नबी आझाद अशी प्रतिक्रिया देणे चुकीचे आहे. ते या देशाचे आहेत. पैशाने नागरिकांना खरेदी केली ही भाषा योग्य दिसत नाही. अशा प्रतिक्रियेचा फायदा पाकिस्तानला होईल. तेव्हा त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे’, अशी मागणी भाजपचे नेते शहनवाझ यांनी केली आहे.

दरम्यान, जम्मू-कश्मीरमध्ये कर्फ्यू कायम असून वातावरण शांत आहे. व्यापारी, सामान्य जनता हिंदुस्थानच्या निर्णयाने खूश आहे. सतत दहशतीच्या वातावरणातून आता सुटका होईल अशा प्रतिक्रियाही नागरिकांनी दिल्या आहेत. दैनंदिन व्यवहार नेहमी प्रमाणे सुरू आहेत. मात्र सैन्य प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवून आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: