पार्थ आराध्ये
पंढरपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढा व बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी अकलूज दौरा केला. यास चांगला प्रतिसाद मिळाला. या सभेमुळे भाजपाला या दोन्ही मतदारसंघात फायदा होवू शकतो. याच बरोबर मोदींच्या या दौर्यामुळे मोहिते पाटील गटामध्ये उत्साह संचारला आहे. जो आगामी त्यांच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.
भाजपाने लोकसभेची प्रत्येक जागा प्रतिष्ठेची केली असून कोणत्याही परिस्थितीत 2019 ला पुन्हा मोदी सरकारच असा नारा दिला आहे. यासाठी पंतप्रधान मोदी हे देशभरात या काळात 150 सभा घेत आहेत. याच अंतर्गत माढा व बारामतीसाठी अकलूजची निवड करण्यात आली होती. वास्तविक पाहता माळशिरस तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. मात्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणूक रणधुमाळीत भाजपात प्रवेश केला व या तालुक्यातील राष्ट्रवादीची ताकदच कमी झाली. मोहिते पाटील समर्थकांनी ही भाजपाची साथ केल्याने आता येथे कमळचा जोर वाढला आहे. मोहिते पाटील गटाचा उपयोग भाजपाला अन्य मतदारसंघात ही होत आहे.
आगामी काळात सोलापूर जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढावी यासाठी पक्षाने पंतप्रधान मोदी यांची सभा अकलूज येथे घेतली. मोहिते पाटील यांच्याकडे नियोजन देण्यात आले होते. त्यांना मोठे कार्यक्रम घेण्याचा अनुभव असल्याने त्यांनी मोदींची सभा विक्रमी घेतली. या सभेच्या निमित्ताने खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे भाजपाच्या व्यासपीठावर आले होते. त्यांनी भाषण केले नाही मात्र पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार केला व त्यांच्या मनोगतात कौतुक ही केले. देशातील सर्वात ताकदवान नेत्याने मोहिते पाटील यांचा सन्मान केल्याने या गटात उत्साहाचे वातावरण आहे. कार्यक्रमाच्या वेळी समर्थकांनी जल्लोष केला होता.
भारतीय जनता पक्षाने अकलूजमध्ये सभा घेताना शेजारच्या बारामती मतदारसंघाचा हा विचार केला आहे. अकलूजच्या शेजारी नीरा नदीच्या पलिकडून हा बारामती लोकसभा मतदारसंघ सुरू होतो. मोहिते पाटील गटाचा इंदापूर भागात ही चांगला जम आहे. यंदा भाजपाने बारामतीची जागा जिंकण्याचा चंग बांधला असून येथून राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या निवडणूक रिंगणात आहेत. शरद पवार यांच्या त्या कन्या असून हा पवारांचा घराचा मतदारसंघ आहे. येथे भाजपाने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे येथे दोन दिवस मुक्कामी होते व अजून ही त्यांचे दौरे सुरूच आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोदी विरूध्द शरद पवार असा सामना रंगला आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात. अकलूजच्या सभेत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांना टार्गेट केले. माढा व बारामती हे राष्ट्रवादीचे बालेकिल्ले असल्याने येथे पवार यांच्यावर टीका होणार हे निश्चितच होते. यातच आता मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला असल्याने त्यांच्या समर्थकांना ही पवार यांच्यावर होत असलेली टीका टिपण्णी आवडत आहे. यामुळे भाजपाचे सर्वच नेेते पवार व राष्ट्रवादी नेत्यांवर सतत टीकास्त्र सोडताना दिसतात.
मोदी यांच्या सभेसाठी बारामती व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील लोक अकलूजला सभेसाठी आली होती. विक्रमी गर्दीमुळे सभा यशस्वी झाली व यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे चित्र होते. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपाची ताकद वाढविणारी हा पंतप्रधानांचा दौरा होता. या गर्दीचे मतांमध्ये कितपत रूपांतर होणार हे 23 मे रोजी समजून येणार आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील हे सध्या भाजपाच्या प्रचारात असून ते सोलापूर व माढ्यात सतत दौरे करत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला जर घवघवीत यश मिळाले तर याचे श्रेय त्यांना जाणार आहे. ते लोकसभेचे उमेदवार नसले तरी त्यांचे काम पाहता तेच स्वतःच माढ्यातून उभे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे व त्यांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून ही चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातच आता मोदींच्या अकलूजच्या यशस्वी सभेमुळे मोहिते पाटील यांचे वजन आणखी या पक्षात वाढण्यास मदत झाली आहे.