Monday, November 27, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईला चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद

by admin
May 12, 2019
in जनरल
0
मुंबईला चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद

हैदराबाद, आयपीएल २०१९ : भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलचे जेतेपद पटकावले.  मुंबईने चेन्नईपुढे विजयासाठी १५० धावांचे आव्हान ठेवले होते. वॉटसनचा अपवाद वगळता एकाही चेन्नईच्या फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळे मुंबईला चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावता आले.

मुंबईच्या १५० धावांच्या आव्हानाचा पाढलाग करताना चेन्नईची चांगली सुरुवात झाली. पण कालांतराने त्यांनी ठराविक फरकाने फलंदाज गमावले. पण यावेळी अपवाद ठरला तो शेन वॉटसन.आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी न करू शकलेल्या वॉटसनने धडाकेबाज फटकेबाजी करत चेन्नईचे आव्हान जीवंत ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना वॉटसनने अर्धशतक झळकावले. ही खेळी साकारताना वॉटसनला तीनवेळा जीवदान मिळाले.

अखेरच्या षटकांमध्ये कायरन पोलार्डने धडाकेबाज फलंदाजी केली. त्यामुळेच आयपीएलच्या अंतिम फेरी मुंबई इंडियन्सलाचेन्नई सुपर किंग्सपुढे 150 धावांचे आव्हान ठेवता आले. चेन्नईकडून दीपक चहरने भेदक मारा करत तीन फलंदाजांना बाद केले. इम्रान ताहिर आणि शार्दुल ठाकूर यांनी यावेळी दोन विकेट्स मिळवत चहरला चांगली साथ दिली.

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबईने धडाकेबाज सुरुवात केली असली तरी रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक बाद झाल्यावर त्यांची धावगती थोडीशी मंदावली. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी मुंबईला स्थैर्य मिळवून द्यायचा प्रयत्न केला, पण त्यांना यामध्ये अपयश आले. कृणाल पंड्यालाही जास्त धावा करता आल्या नाहीत.

मुंबईचा अर्धा संघ माघारी परतला खरा, पण त्यानंतर कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्या यांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. पंड्याला यावेळी पाच धावांवर जीवदान सुरेश रैनाने दिले. पण या जीवदानाचा फायदा पंड्याला उचलता आला नाही. पंड्या १६ धावांवर बाद झाला.

धोनीच्या रनआऊटनंतर पंचगिरीवर पुन्हा प्रश्नचिन्ह?

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील अंतिम फेरीच्या सामन्यात पंचगिरीवरून काही वाद विवाद पाहायला मिळाले. पहिल्या डावात कायरन पोलार्ड पंचांवर भडकला होता. दुसऱ्या डावात धोनीच्या रनआऊटवरूनही पंच टीकेचे धनी ठरताना दिसत होते.

धोनी आऊट आहे की नाही, हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे देण्यात आला होता. धोनी दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होता आणि त्यावेळी दुसरी धाव घेतना हा प्रसंग पाहायला मिळाला. धोनी दुसरी धाव घेत असताना इशान किशनने नॉन स्ट्राइक येथे असलेल्या स्टम्पवर थेट चेंडू मारला. त्यावेळी मैदानातील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सुपूर्द करण्यात आला होता. हा निर्णय कठिण असल्याचे समजले जात होते. त्यावेळी काहींना धोनी नॉट आऊट असल्याचे वाटत होते. पण तिसऱ्या पंचांनी धोनीला आऊट दिले आणि चेन्नईचे चाहते चांगलेच भडकले.

पोलार्ड असा राग काढणं बर नव्हं, पाहा हा व्हिडीओ
आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सपुढे१५० धावांचे आव्हान ठेवले. मुंबईला हे आव्हान चेन्नईपुढे ठेवता आले ते कायरन पोलार्डमुळेच. कारण पोलार्डने या सामन्यात २५ चेंडूंत नाबाद ४१ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच मुंबईला चेन्नईपुढे आव्हनात्मक धावसंख्या ठेवता आली. पण या सामन्यात पोलार्डच्या रागाचा पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळाला.

या सामन्याच्या अखेरच्या षटकात ही गोष्ट पाहायला मिळाली. हे षटक ड्वेन ब्राव्हो टाकत होता. या षटकातील तिसरा चेंडू वाईडच्या लाईनच्या बाहेर पडला. पण पंचांनी यावेळी वाईड दिला नाही. त्यावेळी पोलार्ड चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. पोलार्डने बॅट हातातून उंच उडवली. त्यानंतर चेंडूचा सामना करण्यासाठी पोलार्ड वाईडच्या लाईनजवळ जाऊन उभा राहिला आणि त्याने चेंडू खेळण्यास नकार दिला. त्यावेळी दोन्ही पंचांना पोलार्डची समज काढली आणि सामना सुरु झाला.

फायनलमधली ही भन्नाट कॅच पाहायलाच हवी, पाहा व्हिडीओ…
आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सपुढे १५० धावांचे आव्हान ठेवले. या सामन्यात एक भन्नाट कॅच पाहायला मिळाली. ही कॅच आपल्याच गोलंदाजीवर पकडली ती चेन्नईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने.

मुंबईचे फलंदाज संयतपणे फलंदाजी करत होता. यावेळी कृणाल पंड्या खेळत होता. शार्दुलने एक बाऊन्सर पंड्याच्या दिशेने टाकला. पंड्याला हा चेंडू व्यवस्थित खेळता आला नाही आणि हा चेंडू हवेत उडाला. त्यावेळी शार्दुलने धावत जात अफलातूल झेल पकडला.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आयपीएलइंडियनमुंबई
ADVERTISEMENT
Next Post
भगवंत महोत्सवाचा दुसऱ्या दिवशी गौरव महाराष्ट्राचा ने बार्शीकर रसिकांना केले मंत्रमुग्ध

भगवंत महोत्सवाचा दुसऱ्या दिवशी गौरव महाराष्ट्राचा ने बार्शीकर रसिकांना केले मंत्रमुग्ध

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group