Friday, November 24, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मावळ लोकसभेची लढत शिवसेनेच्या अस्तित्वाची तर राष्ट्रवादीच्या प्रतिष्ठेची,पार्थ पवार श्रीरंग बारणे मध्ये काट्याची लढत

by admin
April 27, 2019
in राजकारण
0
मावळ लोकसभेची लढत शिवसेनेच्या अस्तित्वाची तर राष्ट्रवादीच्या प्रतिष्ठेची,पार्थ पवार श्रीरंग बारणे मध्ये काट्याची लढत

एच सुदर्शन

पिंपरी: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून महाआघाडी तर्फे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार निवडणुकीच्या आखाड्यात असल्याने पवार कुटुंब व राष्ट्रवादीसाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे.
या लढतीसाठी शेवटच्या टप्प्यात राज्यभरातून राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची फौज 29 एप्रिलपर्यंत मावळमध्ये तळ ठोकुन आहे. अजित पवार, शरद पवार यांनीही वेळोवेळी जाहीर सभांमधून पार्थला संधी देण्याचं आवाहन केलेलं आहे. पवारांच्या आवाहनाला मतदार कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे राहील. अजित पवारांनी जुन्या समर्थकांची जुळवाजुळव करून पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फौजच मावळमध्ये कामाला लावली आहे.मावळ मध्ये मराठवाडा सह सोलापूर भागातील हजारो मतदार असल्याने या भागातील नेत्यांनी तिथे बैठका घेतल्या. शिवाय शेकापसोबत आघाडी असल्याने राष्ट्रवादीची बाजू येथे भक्कम मानली जात आहे.शेकापचे जयंत पाटील यांनी पार्थ ची उमेदवारी मागून घेतल्याने त्यांच्या साठी पार्थ चा विजय होणे महत्वाचा आहे.

बारणेंसाठी अस्तित्वाची लढत

विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी ही निवडणूक जणू अस्तित्वाचीच लढाई आहे. त्यांच्याविरोधात यावेळी बलाढ्य पवार कुटुंबातील उमेदवाराने शड्डू ठोकलेले आहेत. बारणेंच्या विजयासाठी अख्खे कुटुंब प्रचारात उतरले आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, पालकमंत्री गिरीश बापट, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, रामदास कदम, डॉ. नीलम गोऱ्हे, नितीन बानगुडे पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे, गौतम चाबुकस्वार, प्रशांत ठाकूर व सुरेश लाड अशी भाजप-शिवसेना नेत्यांची फौजच बारणेंच्या प्रचारासाठी मावळमध्ये उतरली. मावळ मतदारसंघात विजयाची हॅट्ट्रिक मिळवण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. महायुतीतील मित्रपक्ष भाजप व रिपब्लिकन पक्षाचे स्थानिक नेते व कार्यकर्तेही बारणेंच्या प्रचारासाठी सरसावले आहेत. या पार्श्वभूमीवर मावळमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट आहे.

विधानसभा मतदारसंघांची स्थिती

मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पनवेल, मावळ, चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजप, उरण आणि पिंपरीतून शिवसेनेचा तर कर्जतमधून राष्ट्रवादीचा आमदार आहे. एकुणात मावळ लोकसभेवर शिवसेना-भाजपचे वर्चस्व आहे.

असा होता 2014चा निकाल

2014 में मध्ये श्रीरंग बारणेंनी शिवसेनेच्या तिकिटावर लढत 5,12,223 मतांसह विजय मिळवला होता. दुसऱ्या क्रमांकावर पीडब्ल्यूपीच्या तिकिटावर लढत लक्ष्मण जगताप यांनी 3,54,829 मते मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीच्या सुरेश नार्वेकरांना 1,82,293 मते मिळाली होती.

मावळ – एकूण 21 उमेदवार

प्रमुख उमेदवार । शिवसेना – श्रीरंग बारणे । राष्ट्रवादी – पार्थ पवार । वंचित आघाडी – राजाराम पाटील

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: अजित पवारउध्दव ठाकरेपार्थ पवारमावळमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारशिवसेनाश्रीरंग बारणे
ADVERTISEMENT
Next Post
पार्थ ला विजयी करण्याचे मामा पद्मसिंह पाटलांचे आवाहन

पार्थ ला विजयी करण्याचे मामा पद्मसिंह पाटलांचे आवाहन

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group