बार्शी : पोलिसांनी खाकी वर्दीतली माणुसकी जपत कौतुकास्पद कामगिरी बजावली. आपल्या लग्नाचा हरवलेला बस्ता काही तासातच पोलिसांनी भावी वधूला परत मिळवून दिला.
रविवार २६ मे रोजी एक मुलगी तिच्या लग्नाचा बस्ता बांधून रिक्षाने प्रवास करत असताना आपल्या गावाकडे निघाली असता खरेदी केलेल्या कपड्यांची पिशवी त्यामध्ये तिचा स्वतः चा नववधू अलंकार कपडे दागिने आणि सोबत असलेले पैसे असलेली लेडीज पर्स रिक्षामध्ये विसरली. त्यानंतर तिने बाळेश्वर नाका येथे कर्तव्यास असलेले वाहतूक कर्मचारी पोशि बक्कल नं २१०७ श्री संगम वडले, पोशि बक्कल नं ७७० अजित वाघमारे आणि पोशि बक्कल नं ८०० सुनिल सरडे यांना सदर प्रकारची माहिती दिली. त्यानंतर या तिन्ही कर्तव्यदक्ष कर्मचारी यांनी सदर रिक्षा चा शोध घेऊन सदरची बॅग नववधूच्या ताब्यात दिली. शहर पोलिस स्टेशनमध्ये ही बैग संबंधित स्त्रीला परत देण्यात आली. यावेळी, काही क्षणासाठी आपली स्वप्ने गमावणाऱ्या नववधूचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
दरम्यान, याप्रसंगी ठाणे अंमलदार स पो फौ हाजगुडे, पो शि हनुमंत पाडुळे आणि कौतुकास पात्र असे हे तीन कर्मचारीही आनंदी होते.