बार्शी: येथील यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोजर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये यंदापासून औषधनिर्माणशास्त्रातील पदवी कोर्स अर्थात बी.फार्मसीला मान्यता मिळाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अरूण बारबोले यांनी दिली.
यावेळी महाविदयालयाचे प्राचार्य सुजित करपे, कालिदास मुकटे उपस्थित होते. बार्शी तालुक्यातील सर्वात पहिले औषधनिर्माणशास्त्र व्यावसायिक महाविदयालय यशोदा संस्थेच्यावतीने पूर्वीच खांडवी येथे सुरू झाले. या महाविदयालयात डी.फार्म हा दोन वर्षाचा पदविका कोर्सचे शिक्षण दिले जात होते. बार्शी तालुकयासह आसपासच्या तालुक्यातील या शाखेत प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विदयार्थ्यांची यामुळे सोय झाली. याच शाखेत पदवीचे शिक्षण घेण्यासाठी परिसरातील विदयार्थ्यांना दूरवर जावे लागत असे. इच्छुक विदयार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी यासाठी उद्देशाने संस्थेने येथे पदवी कोर्स महाविदयालयात सुरू करण्याचा निर्णय घेवून कार्यवाही केली. विविध मान्यतेनंतर प्रवेश क्षमता ६० असलेला चार वर्षाचा हा पदवी कोर्स यंदापासून बार्शीनजीक खांडवी येथील सोजर महाविदयालयात सुरू होत आहे. औषधनिर्माण शास्त्र पदवी अभ्यासक्रमाची सोय असणारे बार्शी तालुक्यातील हे एकमेव महाविदयालय आहे.