गणेश भोळे/ धीरज करळे
बार्शी:जगाची निर्मीती करणारा देव आहे याला संभाळणारा देव आहे आज अनेकांना देव आहे की नाही असा प्रश्न पडतो खिशातील पैशाची मस्ती सत्तेचा माज आणि अंगातील ताकद एक अहंकार निर्माण करते असेच लोक देव नाही म्हणतात आणि जग आहे म्हणतात हि लोक ज्ञानी नसुन अहंकारी असतात असे मत समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख यांनी व्यक्त केले .ते बार्शी नगरपालिका, भगवंत देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त भगवंत महोत्सवाच्या माध्यमातून सुरू असलेल्या भगवंत महोत्सवाचा पाचव्या दिवशी यांनी तुफान विनोदी कीर्तनात बोलत होते
आजच्या कीर्तनाच्या प्रारंभी शहरातील उद्योजक, आध्यत्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, ह.भ.प.जयवंत महाराज बोधले नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, माजी आमदार राजेंद्र राऊत, सुभाष लोढा,विजय राऊत, रावसाहेब मनगिरे
,औंधकर महाराज,छोटूभाई लोहे, कादर तांबोळी, विनय संघवी,संगीता बहेनजी,संतोष ठोंबरे, परशुराम डोंबे महाराज, विनोद चोप्रा, भास्कर मांजरे महाराज, पठाण महाराज, जवाहर माढेकर,मदन दराडे,अशोक कुंकुलोळ,राजू चांडक,प्राचार्य अनिल देशमाने, कृष्णमूर्ती,रामलिंग पवार, अब्बास शेख, समाधान डोईफोडे, इंद्रजित चिकने आदी उपस्थित होते.
राजाभाऊ राऊत यांनी महोत्सव आयोजनामागील उद्देश सांगत पालिकेच्या वतीने सुरू असलेल्या विकास कामाचा आढावा घेतला.चंदनाचे हात पायही चंदन ! या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन केले.
निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर म्हणाले, आजचा अभंग हा संतांचे महात्म्य सांगणारा, कीर्तन ज्ञानेश्वरी गाथा आणि वारकरी तत्वज्ञान सत्य आहे. बाकी सर्व स्वार्थ आहे आज साखरसम्राट शिक्षासम्राट बारसम्राट पतसंस्था सम्राट पेट्रोल सम्राट आहेत मात्र कोणी रक्त बनवणारा सम्राट नाही याचे कारण रक्त बनवतो पण दिसत नाही पण तो बनवतो आहे तो देव आहे भारतमाता माझी माता आहे त्याची संस्कृती माझी आई आहे तिला डोक्यावर घ्या अनं आई -बापाला न माननारी संस्कृतीचा पायाजवळ ठेवा प्रेम हेच नाशवंत चमड्यावर न करता देशावर करा आज पैशाला किंमत आली विदवानाची किमंत कमी झालीसर्वत्र लबाडी सुरू आहे. आज समाजामध्ये मुली चांगले शिक्षण घेवुन तहसीलदार ते राष्ट्रपती अशा सर्वोच्छ पदापर्यंत पोहचले आहेत आई वडील आपल्या गरजा कमी करून मुलामुलींचे हटट पुरवतात पण आज मोठया मुला मुलींचे पळुन जाण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे आई वडीलांची मान खाली घालावी लागेल असे कृत्य करु नका मोबाईलच्या अतिवापराने मुले मनोरुग्ण बनत आहे मुलांचे मोबाईल पालकाने तपासावे पापाचा पैसा कधी सुखाने जगू देत नाही.चेहऱ्यावर हसू आणि घरी समाधान असू दे. मतदान संपले राजकारण सोडून द्या. राजकारण खालच्या पातळीवर गेले आहे.भावाशी दुष्मनी करू नका.99 टक्के कारभार प्रसिद्धी साठी सुरू आहे .दुष्काळ फक्त शेतकरी आणि जनावरांना आहे.पैसा चांगल्या ठिकाणी खर्च करा. झाडे लावा, अवयव दान करा.कष्ट करायला लाजू नका. आदी उदाहणासह विनोदी शैलीत उपदेशाचे डोस दिले यावेळी भगवंत मैदान हजारोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थीतांनी संपूर्ण मैदान व गॅलरी खचाखच भरले होते.


