Thursday, November 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्रकार सूर्यकांत भिसे यांना मुक्ताई संस्थानचा ” भागवत धर्म प्रसारक ” पुरस्कार जाहिर आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरात वितरण

by धिरज करळे
June 12, 2019
in महाराष्ट्र
0
पत्रकार सूर्यकांत भिसे यांना   मुक्ताई संस्थानचा ” भागवत धर्म प्रसारक ” पुरस्कार जाहिर   आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरात वितरण


मुक्ताईनगर: वारकरी सांप्रदायात प्रचार व प्रसाराचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांना श्री क्षेत्र कोथळी – मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताबाई संस्थानच्या वतीने यंदापासून सहकार महर्षी भाऊसाहेब उर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ ” भागवत धर्म प्रसारक ” हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे . या पहिल्याच पुरस्कारासाठी वेळापूर जि . सोलापूर येथील जेष्ठ पत्रकार व राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांची निवड करण्यात आहे .
शुक्रवार दि . १२ जुलै आषाढी एकादशी दिवशी दुपारी २ वाजता संत मुक्ताबाई मठ श्री क्षेत्र पंढरपूर येथे या पुरस्काराचे वितरण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले यांचे हस्ते व माजी आ सुधाकरपंत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष ॲड रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांनी दिली . यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर , श्री पांडुरंग पालखी सोहळा प्रमुख विठ्ठल महाराज वासकर , ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार विजेते मारोती महाराज कु-हेकर , निवृत्ती महाराज वक्ते , माऊलीच्या पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर , श्रीमंत उर्जितसिंह शितोळे , संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष पंडीत महाराज कोल्हे , संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष ॲड विकास ढगे पाटील , संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे , संत सोपानदेव संस्थानचे अध्यक्ष गोपाळ महाराज गोसावी , संत नामदेव महाराज पालखी सोहळा प्रमुख केशव महाराज नामदास , संत एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी , श्री रुक्मिणीमाता पालखी सोहळा प्रमुख सुरेश महाराज चव्हाण , वारकरी फडकरी दिंडी समाजाचे अध्यक्ष माऊली जळगावकर , श्री ज्ञानेश्वर महाराज दिंडी समाजाचे अध्यक्ष मारुती कोकाटे , अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले , बाळासाहेब महाराज देहूकर यांच्यासह वारकरी सांप्रदायातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी सांगितले .

पुरस्काराचे स्वरुप
वारकरी सांप्रदायाची व भागवत धर्माची दीक्षा संत निवृत्तीनाथ महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांना दिली . संत ज्ञानदेव , संत नामदेव , संत सोपानदेव , संत मुक्ताबाई , संत एकनाथ आदिनी या धर्माचा प्रचार व प्रसार केला . संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला . आज विज्ञान युगात या धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे काम वारकरी , फडकरी , दिंडीकरी , कीर्तनकार , प्रवचनकार यांच्या बरोबरच प्रसार माध्यमांनी मोठ्या प्रमाणात केला आहे . त्यामुळेच हा सांप्रदाय जागतिकस्तरावर पोहोचला आहे . प्रसार माध्यमातील पत्रकारांच्या या कार्याची दखल घेवूनच श्री संत मुक्ताबाई संस्थानच्या वतीने यंदापासून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे . मानपत्र , सन्मानचिन्ह , फेटा , उपरणे , श्रीफळ व पुष्पहार देवून सूर्यकांत भिसे यांचा सन्मान करण्यात येणार आहे .

सूर्यकांत भिसे यांचे कार्य
सूर्यकांत भिसे हे वेळापूर ता माळशिरस जि सोलापूर येथील रहिवाशी असून गेली २९ वर्षे त्यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून वारकरी सांप्रदाय व भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला आहे . राज्यातील मानाच्या सात पालखी सोहळ्यांना शासनाच्या सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून त्यांनी प्रयत्न केला आहे . संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात संत तुकाराम महाराजांची आरती सुरु करणे , संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदीला नेणे , श्री पांडुरंग पालखी सोहळा श्री क्षेत्र मुक्ताबाई समाधी सोहळ्यासाठी नेणे , श्री क्षेत्र वेळापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट व श्री क्षेत्र नाशिक असे पायी दिंडी पालखी सोहळे त्यांनी सुरु केले आहेत .

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आषाढी एकादशीभागवत धर्म पुरस्कारसंत मुक्ताई
ADVERTISEMENT
Next Post
दोन रणजितसिंहांच्या तगाद्याने माढा मतदारसंघाला नीरेच्या पाण्याचा लाभ  ,विजयदादांना मुख्यमंत्र्यांनी दिली वाढदिवसाची भेट

दोन रणजितसिंहांच्या तगाद्याने माढा मतदारसंघाला नीरेच्या पाण्याचा लाभ ,विजयदादांना मुख्यमंत्र्यांनी दिली वाढदिवसाची भेट

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group