अकलूज: साध्वी प्रज्ञा सिंग हिने शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत जे वक्तव्य केले आहे, त्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. राष्ट्रीयत्वाबाबत बोलण्याचा आता एका राष्ट्रीय पक्षाला कवडीचा अधिकार राहिला नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप वर केली.
माढाचे महाआघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी आज नातेपुते येथील सभेत पवार बोलत होते. माढा मतदारसंघातील जनतेंच नि आमचं ठरलंय संजय शिंदे यांना निवडून आणायचंच. अकलूजचा दहशतवाद हा गल्लीबोळातला दहशतवाद असून तो संपवण्यासाठी मी स्वतः या भागात आमदाराप्रमाणे काम करेन.
आपल्या जुन्या सहकाऱ्याबद्दल मी कधी आकसाने बोलणार नाही. पण आता त्यांनी फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नये. नाहीतर सहकारमहर्षींना काय वाटेल? मोहिते पाटलांचा हा पोरगा कधी मुख्यमंत्री, तर कधी गिरीश महाजन यांच्या घरासमोर तासनतास उभा राहू लागला. इतकी वर्ष सत्ता भोगलेल्याला असे इतरांच्या दारात उभे राहणे शोभते का?
मोहिते-पाटील यांना इतकी वर्षे सत्ता दिली त्यावेळी कृष्णा भीमा स्थिरीकरणाबाबत काम करायचा विचार यांच्या डोक्यात कसा आला नाही? मोहिते पाटील यांना रणजीतला सत्ता द्यायची होती. आम्ही विधान परिषदेवर आमदारकी आणि नंतर राज्यसभेतली खासदारकी दिली. मात्र जिल्ह्यात फिरून इतर तालुक्यात याने उद्योग सुरू केल्याच्या तक्रारी आल्याने त्यांना लोकसभेला नाकारले.